मुंबई : कारच्या काचेवर ठकठक करत मोबाइल लंपास करण्याचा प्रयत्न करणाऱ्या ‘ठक ठक’ टोळीच्या एकाला मालाड पोलिसांनी शनिवारी अटक केली. विनोदवीर भरत गणेशपुरे यांचा कांदिवलीत अशाच प्रकारे मोबाइल पळविण्यात आला होता. त्यानुसार तपास अधिकारी अटक व्यक्तीची कसून चौकशी करत आहेत.मालाडच्या एस.व्ही. रोडवर असणा-या बाबुलीन नाक्याजवळ २९ आॅगस्ट, २०२० रोजी तक्रारदार हे कारमधून निघाले होते. वाहतुकीच्या कोंडीमुळे त्यांनी कारचा वेग कमी केला. त्याच वेळी त्यांच्या कारच्या डाव्या खिडकीजवळ एक व्यक्ती आली आणि त्याने ‘ठकठक’ केली. तक्रारदाराने खिडकी उघडली तेव्हा ती अनोळखी व्यक्ती ‘तुम्ही कार माझ्या पायावर चढवली’ असे सांगत वाद घालू लागला.तितक्यात उजव्या खिडकीवर दुस-या व्यक्तीने तसेच करत ‘कार मध्येच थांबवू नका, ट्राफिक होतंय’ असे सांगू लागला. त्याचा फायदा घेत पहिल्या इसमाने तक्रारदाराचा मोबाइल उचलून पळ काढला. मात्र ही बाब त्यांच्या लक्षात आल्याने त्यांनी आरडाओरड करण्यास सुरुवात केली.ते ऐकून गस्तीवर असलेले मालाड पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक प्रवीण तुपारे आणि डिटेक्शनचे बनसोडे यांनी वसीम कुरेशी (२७) नामक सराईताला अटक केली. गणेशपुरे यांचाही मोबाईल अशाच प्रकारच्या टोळक्याने पळवला असल्याने यामध्ये कुरेशीचा काही सहभाग आहे का, याची चौकशी सुरू आहे.पाठलाग करूनदोनशे ते तीनशे मीटर पाठलाग केला आणि वसीम कुरेशी (२७) नामक सराईताला अटक केली. कुरेशी हा मेरठचा राहणारा असून त्याच्यावर मेरठ, दिल्ली, उत्तर प्रदेश आणि मुंबईमध्ये अनेक गुन्हे दाखल आहेत. गणेशपुरे यांचाही मोबाइल अशाच प्रकारे चोरला़
‘ठक ठक’ टोळीच्या सराईताला मालाडमध्ये अटक, अभिनेता गणेशपुरे यांच्या मोबाईलची होणार चौकशी
By ऑनलाइन लोकमत | Published: September 03, 2020 2:26 AM