चाळीसगाव (जि.जळगाव) : टाकळी प्र. चा. भागातील स्वयंवर मंगल कार्यालयाच्या समोर असणारे स्टेट बँकेचे एटीएम मशीनच चोरट्यांनी पळवून नेले. मंगळवारी रात्री दीड ते अडीच वाजेच्या दरम्यान ही घटना घडली.
एटीएम हे अत्यंत गजबजेल्या भागात आहे. चोरट्यांनी काचेचा दरवाजा फोडून मशीन लांबविले आहे. मंगळवारी दुपारी या एटीएममध्ये १७ लाखाची रोकड भरल्याची माहिती मिळाली आहे.
रात्री गस्त घालणाऱ्या पोलीस पथकाला चोरीची घटना लक्षात आली. त्यांनी गाळेधारकाला उठवून पोलीस निरीक्षक विजयकुमार ठाकुरवाड यांनाही ही घटना कळवली. पोलिसांनी तातडीने तपासचक्रे फिरविण्यास सुरुवात केली आहे.