शहरं
Join us  
Trending Stories
1
लाचप्रकरणी अदानींवर अमेरिकेत अटक वॉरंट, उद्धव ठाकरेंची टीका; म्हणाले, “चार दिवस आधीच...”
2
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
3
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
4
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
5
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
6
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
7
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
8
IPL Auction 2025: MIला ८, CSKला ७... कोणत्या टीमला किती परदेशी खेळाडू विकत घेता येणार?
9
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा
10
  राणेंचा दबदबा की ठाकरे गट बाजी मारणार? असा आहे सिंधुदुर्गाचा कल
11
“विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार महायुतीसोबत येऊ शकतात”; नारायण राणेंचे सूचक विधान
12
राहुल गांधी, खर्गेंना विनोद तावडेंची कायदेशीर नोटीस; पैसे वाटप प्रकरण तापणार
13
नेत्रदिपक भरारी! शेतकऱ्याच्या लेकीने रचला इतिहास; अवघ्या १९ व्या वर्षी झाली पायलट
14
ईव्हीएम, कर्मचाऱ्यांसाठी वापरलेल्या एसटी बसमध्ये सापडली 500 रुपयांची बंडले; कोणाची? 
15
जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री? मविआचा फॉर्म्युला काय ठरला? काँग्रेस नेत्यांनी सगळेच सांगितले
16
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: धडधड वाढते ठोक्यात! 'महानिकाला'ला उरले काही तास; राजकीय नेत्यांची आकडेमोड, प्रशासनाचा 'ॲक्शन मोड'
17
AUS vs IND Day 1: बुमराहचा 'चौकार'! २ सत्र गाजवणारा ऑस्ट्रेलियन संघ दिवसाअखेर बॅकफूटवर
18
घडामोडींना वेग! मनसे नेते बाळा नांदगावकरांनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट; बैठकीत काय घडले?
19
समंथा रुथ प्रभू बनली सर्वात लोकप्रिय भारतीय सेलिब्रिटी; करिना, दीपिकालाही टाकलं मागे
20
५१ चौकार, २९७ धावांचा पाऊस... वीरेंद्र सेहवागचा मुलगा आर्यवीरचा धुमधडाका, पण Ferrari थोडक्यात हुकली

चोरट्यांनी डुप्लिकेट चावीने चोरलेल्या ५१ मोटारसायकली हस्तगत

By शेखर पानसरे | Published: March 29, 2023 5:55 PM

जिल्हा पोलिस अधीक्षकांची माहिती ; संगमनेर पोलिसांची कारवाई

शेखर पानसरे

संगमनेर : चोरट्यांनी डुप्लिकेट चावीने चोरलेल्या ५१ मोटारसायकली पोलिसांनी हस्तगत केल्या आहेत. मंगल कार्यालये, लॉन्स अशा गर्दीच्या ठिकाणाहून हे चोरटे मोटारसायकलींची चोरी करायचे. अहमदनगर आणि नाशिक जिल्ह्यांतून चोरी केलेल्या मोटारसायकली पोलिस पथकाने सेंधवा (मध्यप्रदेश), नाशिक, छत्रपती संभाजीनगर, पुणे, वाशिम या जिल्ह्यांतून हस्तगत केल्याचे अहमदनगरचे जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी सांगितले.    

जिल्हा पोलीस अधीक्षक ओला हे बुधवारी (दि.२९) संगमनेरात आले होते. संगमनेर उपविभागाच्या अंतर्गत येणाऱ्या पोलीस ठाण्यांतील पोलीस निरिक्षकांची त्यांनी बैठक घेत कायदा सुव्यवस्था याबाबत माहिती घेतली. त्यानंतर संगमनेर शहर पोलीस ठाण्यात पत्रकारांशी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. अक्षय सावन तामचिकर (वय १८), सुरजित दिलिपसिंग तामचिकर (वय २२) (दोघेही. रा. घुलेवाडी, संगमनेर) पकडण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. मोटारसायकली चोरींच्या गुन्ह्यात समावेश असलेल्या एका विधिसंघर्षग्रस्त बालकास त्याच्या नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले आहे. संगमनेर उपविभागाचे प्रभारी उपविभागीय पोलिस अधिकारी संजय सातव, शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक भगवान मथुरे यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेर उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालयातील विशेष पोलिस पथकातील पोलीस नाईक अण्णासाहेब दातीर, पोलीस कॉन्स्टेबल सुभाष बोडखे, प्रमोद गाडेकर, अमृत आढाव आदींनी सखोल तपास करत चोरीला गेलेल्या ५१ मोटारसायकली हस्तगत केल्या आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसThiefचोरSangamnerसंगमनेर