शहरं
Join us  
Trending Stories
1
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
2
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
3
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
4
रिझर्व्ह बँक व्याजदरात कपात करणार की नाही? Moodys नं सांगितला काय आहे देशाचा 'मूड'
5
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
6
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
7
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
8
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
9
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
10
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
11
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
12
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
13
लॉटरी किंगकडून आठ कोटींची रक्कम जप्त
14
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
15
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
16
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
17
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
18
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
19
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
20
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."

‘त्या’ कुत्र्या, मांजरांची अंधश्रद्धेतून हत्या

By ऑनलाइन लोकमत | Published: May 07, 2019 1:25 AM

विरार पश्चिमेतील ग्लोबल सिटी मधील फ्लॅटमधून रविवारी पोलिसांनी मुक्त केलेल्या कुत्र्या व मांजरांचा वापर त्यांना डांबवून ठेवणारी महिला करणी कवटाळणी करण्यासाठी बळी देण्याकरीता करीत असावी असा आरोप केला आहे.

विरार : विरार पश्चिमेतील ग्लोबल सिटी मधील फ्लॅटमधून रविवारी पोलिसांनी मुक्त केलेल्या कुत्र्या व मांजरांचा वापर त्यांना डांबवून ठेवणारी महिला करणी कवटाळणी करण्यासाठी बळी देण्याकरीता करीत असावी असा आरोप केला आहे.गेल्या तीन महिन्यांपासून ग्लोबल सिटी मधील यू बिल्डींगमधील सदनिका नंबर २०१ मध्ये भावना जोगाडिया नावाची महिला तिच्या दोन मुलींसोबत राहत होती. या तिच्या भल्या मोठ्या घरात तिने 15 कुत्रे व 25 मांजरी पाळल्या होत्या. गेल्या तीन महिन्यांपासून तिने एवढ्या मोठ्या प्रमाणात प्राण्यांना आपल्या घरात ठेवले आहे याची माहिती कोणालाच नसल्याने इतर रहिवाश्यांनी याकडे लक्ष दिला नाही. मात्र, गेल्या काही दिवसांपासून घरातून घाण वास येऊ लागला तसेच रात्री अपरात्री कुत्रे मांजरीच्या ओरडण्याचा आवाज येत असल्याने रहिवाश्यांनी घर मालकाकडे याची तक्र ार केली.घर मालका कडून काही उत्तर येत नसल्याने रहिवाश्यांनी मिळून घराची तपासणी केली असता त्यांना 20 ते 25 मांजरी व 15 कुत्रे आढळले. रहिवाश्यांनी घराचा तपास घेतल्या नंतर त्यांना कुत्री व मांजरीची कातडी आढळली. महिलेच्या घरात 10 गाठोडी देखील होती त्यात नेमकं काय आहे याचा तपास रहिवाश्यांना लावता आला नाही. रहिवाशी आत शिरताच काही कुत्रे घरातून पळून गेल्याने कुत्र्यांची नेमकी किती संख्या होती हे कळलेलं नाही. रहिवाश्यांनी संपूर्ण घराची तपासणी करून याबाबत अर्नाळा पोलीस ठाण्यात तक्र ार नोंदवली व त्यानंतर पोलिसांनी येऊन संपूर्ण घटनेचा पंचनामा देखील केला व महिले विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. इमारती मध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात प्राणी ठेवण्याची अनुमती नसल्याने महिला या प्राण्यांना इंजेक्शन देऊन त्यांना बॉक्समध्ये भरून घरात आणायची अशी माहिती तिने पोलिसांना दिली आहे. पोलिसांकडून कोणत्याही प्रकारचा तपास होत नसल्याने नागरिकांनी कचº्याचे डब्बे तपासले व त्यात त्यांना मेलेल्या कुत्र्यांचे व मांजरीचे तुकडे सापडले. महिलेच्या घरासमोर राहणाऱ्या कविता सिंग यांनी आपल्या घरातून अनेकदा त्या मिहलेला जादू टोणा करताना पाहिले होते तर याबाबत तिने इमारतीतील रहिवाश्यांना सूचना देखील दिली होती परंतु त्यांनी याकडे काही लक्ष दिले नाही. आता पर्यंतची परिस्थिती बघता महिला या प्राण्यांचा उपयोग बळी देण्याकरिता व जादू टोणा करण्याकरिता करत असल्याचा आरोप आहे. महिलेने हे तुकडे गेल्या अनेक दिवसांपासून घरात ठेवल्यामुळे ते कुजून त्याचा प्रचंड दुर्गंध सुटला व त्याचा त्रास आता रहिवाशांना होेऊ लागला होता. तर तपासा दरम्यान घरात सापडलेले कुत्रे व मांजरी यांची अवस्था अतिशय वाईट असल्या कारणाने त्यांच्यावर देखील अत्याचार केला जात असल्याचे समोर आले आहे. तसेच मांजरीचे मृत देह मिळाल्यावर त्यांचे शरीर पूर्ण पणे सुकलेले असल्या कारणाने व त्यांच्या शरीरावर इंजेक्शनची निशाणी असल्याने रक्त काढल्याचा आरोप करण्यात आला आहे.प्राण्यांना वाचविण्याकरिता आम्ही जमेल ते सर्व प्रयत्न केले आहेत आम्हाला 5 ते 6 मेलेल्या मांजरी सापडल्या तसेच 2 कुत्र्यांचे मृतदेह सापडले. इतर काही कुत्रे गंभीर आहेत व त्यांना उपचारासाठी पाठवण्यात आले आहे. महिलेने मांजरीचे रक्त काढलेले आहे त्यामुळे त्यांच्या अंगावर इंजेक्शनची निशाणी देखील होती.- अमित शहा, प्राणी मित्र,बर्याच दिवसांपासून उग्र व घाण वास येत होता व महिलेला देखील वारंवार याबाबत विचारण्यात आले होते परंतु तिने काहीच उत्तर न दिल्याने आम्ही घरात घुसलो व चौकशी केली.- सुदिप्ती सिंग, रहिवासी .इमारती मध्ये प्राण्यांचे मृतदेह सापडले आहेत. मात्र, मला त्या बाबत काहीच कल्पना नाही. मला यातले काहीच माहित नाही.’’-भावना जोगाडीया, आरोपी महिला

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी