लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव : सिनेस्टाईल पाठलाग करुन खामगाव पोलिसांनी अटक केलेल्या अट्टल चोरट्यांनी नागपूर व नांदेड येथील पाच एटीएम फोडल्याची कबुली दिली आहे. या चोरट्यांना घेवून खामगाव पोलिस नागपूर व नांदेड येथे गेले होते. तपासादरम्यान चोरट्यांनी घटनाक्रम कथन करत चोरी केलेल्या एटीएमबाबत सांगितले. या चोरट्यांनी नागपुरातील तीन एटीएम तर नांदेडमधील दोन एटीएम फोडून लाखोंची रोकड चोरी केली होती. दरम्यान या टोळीतील शक्कोबी मो.मुश्ताक हिला हरियाणा पोलिसांनी अटक केल्याची माहिती खामगाव पोलिसांनी दिली आहे. या टोळीवर हरियाणातही अनेक गुन्हे दाखल असून तेथील पोलिस शक्कोबीची कसून चौकशी करीत आहे. चौकशी पूर्ण झाल्यानंतर तिला खामगाव पोलिस तपासकामी ताब्यात घेणार असल्याचेही पोलिसांनी सांगितले. या टोळीचा मुख्य सुत्रधार मो.मुश्ताक अद्याप फरार असून पोलिस त्याच्या मागावर आहेत. अटक करण्यात आलेले सर्वजण अट्टल चोरटे असून त्यांच्याकडून देशभरातील अनेक गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता असून पोलिस कसून चौकशी करीत आहेत.(प्रतिनिधी)
'त्या' चोरट्यांची पाच एटीएम फोडल्याची कबुली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 06, 2018 6:35 PM
खामगाव : सिनेस्टाईल पाठलाग करुन खामगाव पोलिसांनी अटक केलेल्या अट्टल चोरट्यांनी नागपूर व नांदेड येथील पाच एटीएम फोडल्याची कबुली दिली आहे.
ठळक मुद्दे चोरट्यांनी नागपुरातील तीन एटीएम तर नांदेडमधील दोन एटीएम फोडून लाखोंची रोकड चोरी केली होती. या टोळीतील शक्कोबी मो.मुश्ताक हिला हरियाणा पोलिसांनी अटक केल्याची माहिती खामगाव पोलिसांनी दिली आहे.टोळीचा मुख्य सुत्रधार मो.मुश्ताक अद्याप फरार असून पोलिस त्याच्या मागावर आहेत.