शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाटक आर्थिक संकटात! जेवढी द्यायची ऐपत, तेवढीच आश्वासने द्या...; खर्गेंनी महाराष्ट्रावरून नेत्यांचे कान टोचले
2
पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार परिषदेच्या अध्यक्षांचे निधन; मोदींकडून शोक व्यक्त
3
IND vs NZ : भारताची आपल्या घरात 'कसोटी' तरी बुमराहला का विश्रांती? BCCI ने सांगितलं महत्त्वाचं कारण
4
ई-स्कूटर घ्या; पण तक्रारींचे काय? कंपन्यांविराेधात १२ हजार तक्रारी, केंद्र सरकार करणार चाैकशी
5
गुरु-शुक्राचा राजयोग: ९ राशींना सुखकर, दिवाळीनंतरही लाभ; उत्पन्न वाढ, नवीन नोकरीची संधी!
6
शरद पवारांच्या भेटीसाठी बारामतीत मोठी गर्दी; गोविंदबागेत उभे रहायलाही जागा नाही...
7
आधी बारावी, मग नववी; अस्लम शेख यांच्या उमेदवारी अर्जावर आक्षेप, विनोद शेलार कोर्टात जाणार  
8
भेटायला आले, नमस्कार केला अन् गोळ्या झाडल्या; दिवाळी साजरी करणाऱ्या काका-पुतण्याची हत्या
9
मनसे कार्यकर्त्यांनी मनसेच्या उमेदवाराचेच कार्यालय फोडले; अकोल्यात मोठा राडा, नेमके काय घडले...
10
अर्जुन कपूरने ब्रेकअप झाल्याचं सांगताच मलायकाची पोस्ट, म्हणते - "एका क्षणासाठी..."
11
मी कुठे सांगतो माझा प्रचार करा, विरोध अपेक्षितच; नवाब मलिक भाजप नेत्यांवर कडाडले
12
HDFC Bankची उपकंपनी HDB फायनान्शिअल सर्व्हिसेस आणणार IPO; 'इतके' हजार कोटी उभे करणार
13
'सिंघम अगेन'च्या शेवटी मिळालं खास सरप्राइज! सलमान खानच्या एन्ट्रीने झाली नव्या सिनेमाची घोषणा
14
भारतात 2050 पर्यंत मुस्लीम लोकसंख्येत मोठी वाढ होणार, 'या' 3 देशांत हिंदू जवळपास 'संपुष्टात' येणार!
15
'विराट' विक्रम मोडला! इथं पाहा IPL च्या इतिहासातील Expensive Retained Players ची यादी
16
ऐन दिवाळीत नेते बंडोबांना थंडोबा करण्याच्या मोहिमेवर; महायुती, महाआघाडीसाठी पुढील ४ दिवस वाटाघाटीचे
17
प्रियांका गांधींनी गुंतवलेल्या Mutual Fund नं किती दिले रिटर्न? तुमच्यासाठी फायद्याचा सौदा आहे की नाही?
18
सदा सरवणकरांनी घेतली मुख्यमंत्री शिंदेंची भेट, माहिमच्या जागेवर चर्चा, मोठा निर्णय होणार?
19
IND vs NZ 3rd Test : न्यूझीलंडनं टॉस जिंकला, मॅच कोण जिंकणार?
20
गॅस सिलिंडर, UPI पेमेंट ते तिकीट बुकिंग; आजपासून बदलले 'हे' नियम बदलले, थेट खिशावर होणार परिणाम

सायबर गुन्ह्यांच्या हजारो तक्रारी; केवळ १५०० गुन्हे दाखल; कोरोनामुळे तपास थंडावला

By ऑनलाइन लोकमत | Published: July 24, 2020 1:42 AM

ऑनलाइन फसवणुकीच्या गुन्ह्यांत वाढ

- विवेक भुसे पुणे : सायबर गुन्ह्यांबाबतच्या तक्रारीत तिपटीने वाढ होत असताना राज्यात गुन्हे दाखल होण्याचे प्रमाण मात्र त्या मानाने कमी आहे़ गेल्या ५ महिन्यांत १ हजार ५१८ गुन्हे दाखल झाले असून, केवळ ८८ गुन्हे उघडकीस आणण्यात पोलिसांना यश आले आहे़ सायबर गुन्हे करणाऱ्या टोळ्या या प्रामुख्याने परराज्यांतील असल्याने लॉकडाऊनच्या काळात प्रवासावरील बंधनांमुळे हा तपास जवळपास थंडावला आहे.

राज्यात अनेक जिल्ह्यांमध्ये काही हजारांपर्यंत सायबर गुन्ह्यांच्या तक्रारी दाखल आहेत़ मात्र, या सर्व तक्रारींचा तपास करण्यासाठी पोलिसांकडे आवश्यक तेवढे बळ उपलब्ध नाही़ दुसरीकडे यातील सायबर चोरटे हे प्रामुख्याने नोएडा, दिल्ली, पश्चिम बंगाल, झारखंड, राजस्थान या राज्यांतील असल्याने तेथे जाऊन त्यांच्या शोध घेऊन आरोपींना पकडणे हे अतिशय अवघड काम झाले आहे.

राज्यात सायबर गुन्हेगारीमध्ये डेबिड कार्ड, क्रेडिट कार्डचा गोपनीय क्रमांक विचारून फसवणूक केल्याचे दिसून येत आहे़ याशिवाय फसवणुकीचे वेगवेगळे  फंडे वापरून सायबर चोरटे नागरिकांना ऑनलाईन लुबाडताना दिसत आहेत़ गेल्या वर्षी २०१९ मध्ये राज्यात ४ हजार ६२२ सायबर गुन्हे दाखल झाले होते, तर २०१८ मध्ये ३ हजार ५११ गुन्हे दाखल झाले होते.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या ४ महिन्यांत सायबर चोरट्यांनी नागरिकांची फसवणूक केलेल्यांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे़ मात्र, त्याचा प्राथमिक तपास केल्यानंतर या तक्रारीवरून गुन्हे दाखल केले जातात़ कोरोनामुळे पोलिसांकडून गुन्हे दाखल होण्याचे प्रमाण कमीझाले आहे़ गेल्या ५ महिन्यांत राज्यात १ हजार ५१८ गुन्हे दाखल झाले आहेत़ त्यापैकी सर्वाधिक गुन्हे हे जानेवारीमध्ये ४२० दाखल झाले होते़ त्यापैकी ३५ गुन्हे उघड होऊन ४७ आरोपींना अटक करण्यात आली होती़ त्यानंतर गुन्हे दाखल होण्याचे प्रमाण कमी होत गेले आहे.

ऑनलाइन फसवणूक

ऑनलाईन फसवणुकीत प्रामुख्याने डेबिट/क्रेडिट कार्ड क्लोनिंग, ऑनलाईनखरेदी करून फसवणूक, ओटीपी शेअर करायला लावून फसवणूक, हनीट्रॅप,सोशल मीडियावर बदनामी, वाहन खरेदीत फसवणूक, फेसबुक हॅकिंग, जॉब फ्रॉड,गिफ्ट फ्रॉड, अशा प्रकारे गुन्ह्यांचे स्वरूप आहे.

टॅग्स :cyber crimeसायबर क्राइम