शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: ७२ खेळाडूंना मिळाला खरेदीदार, ४६७ कोटींची उलाढाल! कोणता खेळाडू कुठल्या संघात? पाहा यादी
2
लाडक्या बहिणींना मिळणाऱ्या ₹1500 चे लवकरच ₹2100 होणार, मुख्यमंत्री शिंदेंची मोठी घोषणा!
3
IPL Auction 2025: डेव्हिड वॉर्नर ते पियुष चावला... 'हे' खेळाडू राहिले UNSOLD! सर्वच संघांनी फिरवली पाठ
4
IPL Auction 2025: पहिल्या दिवसात ७२ खेळाडूंची विक्री, पाहा कोण ठरले Top 10 महागडे शिलेदार
5
TATA IPL Auction 2025 Live: ७२ खेळाडूंचं 'शॉपिंग'; ४६७.९५ कोटींची बोली... पहिल्या दिवशी भारतीय खेळाडूंचा बोलबाला
6
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या मैदानात उतरल्या होत्या 363 महिला, किती जिंकल्या? असा राहिला महायुतीचा स्ट्राइक रेट
7
"प्रिय बंधु-भगिनींनो... सप्रेम नमस्कार..."! देवेंद्र फडणवीस यांचं जनतेला पत्र; सांगितले विजयाचे 4 'खरे शिल्पकार'
8
IPL Auction 2025 : RR च्या नाकावर टिच्चून MI नं खेळला मोठा डाव; ६२ धावांच्या 'त्या' इनिंगमुळे हा खेळाडू रात्रीत 'करोडपती'
9
IPL Auction 2025: तब्बल ५ तासांनी Mumbai Indians ने विकत घेतला पहिला खेळाडू, १२.५० कोटींना कोण आलं संघात?
10
'ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले', अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर बोचरी टीका
11
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सने सोडलेला जोफ्रा आर्चर अखेर राजस्थान रॉयल्समध्ये गेला, किती मिळाली किंमत?
12
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
13
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
14
"सर्वेक्षण करा, जी ज्याची जागा असेल त्याला देऊन टाका..."; संभल जामा मशीद प्रकरणावर काय म्हणाले राकेश टिकैत?
15
IPL Auction 2025 : MI नं दिला नाही भाव; Ishan Kishan साठी काव्या मारन यांनी लावली एवढ्या कोटींची बोली
16
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
17
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
18
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
19
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान

२ हजाराच्या नोटाच्या देण्याच्या बहाण्याने ८० लाखाला गंडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 02, 2020 10:06 PM

आंतरराज्य टोळीला अटक; गुन्हा अन्वेषण शाखेची कारवाई

मुंबई : दोन हजार रूपयाच्या नोटा अर्ध्या किंमती देण्याच्या बहाण्याने नागरिकांना लुबाडणाºया एका आंतरराज्य टोळीचा छडा लावण्यात गुन्हा अन्वेषण शाखेच्या पोलिसांना यश आले. गोरेगाव (पूर्व) येथील हॉटेल वेस्ट इनमध्ये छापा टाकून तिघांना अटक केली.मुंबईसह कोलकत्ता, बंगळूर,आग्रा, दिल्ली याठिकाणी अनेकांना गंडा घातल्याची कबुली दिली आहे. गेल्या दोन महिन्यापासून हे रॅकेट मुंबई उपनगरात कार्यरत होते. त्यांचे आणखी काही साथीदार फरारी असून त्यांचा शोध घेतला जात आहे.विमानतळाशेजारील हॉटेल ‘वेस्ट इन’मध्ये शनिवारी भारतीय चलनातील दोन हजार रुपयाच्या नोटा निम्मा किंमतीत देण्याच्या बहाण्याने दक्षिण मुंबईतील एका व्यापाºयाची मोठ्या प्रमाणात फसवणूक केल्याची माहिती गुन्हा अन्वेषण शाखेच्या कक्ष-२च्या पथकाला मिळाली. त्यानुसार त्याला बोलावून विचारणा केली असता त्याने सांगितले की, काही दिवसापूर्वी एका आरोपीने हॉटेलमध्ये बोलावून एकाची ओळख करुन दिलेल्या एका आरोपीने केंद्र सरकारमध्ये वरिष्ठ अधिकारी असल्याचे ओळखपत्र दाखविले. २ हजार रुपयाच्या सेंकड सिरीज असलेल्या नोटा आम्हाला मिळतात, त्या निम्या किंमतीत देवू , असे सांगून त्याच्या दोन हजाराच्या प्रत्येकी ५ नोटा देत त्याबदल्यात ५०० व शंभर रुपयाच्या नोटा घेतल्या होत्या, त्याने घेतलेल्या नोटा बाजारात खपल्याने त्याचा त्यांच्यावर विश्वास बसला. त्यानंतर अशा प्रकारच्या १ कोटी ६० लाख रुपये मूल्याच्या २ हजाराच्या नोटा निम्या किंमतीत घेण्याची त्याने तयारी दर्शविली. त्यानुसार ५०० व १०० रूपयाच्या चलनी नोटा असलेली ८० लाख रुपये घेवून तो शनिवारी हॉटेलमध्ये पुन्हा गेला. त्यावेळी एकाने त्याच्याकडील नोटा घेत आमच्या एका सहकाºयाला एटीएसच्या पोलिसांनी पकडले आहे, त्यामुळे तू ही बॅँग घेवून लवकर निघून जा, असे सांगितले. त्याने बॅग उघडून पाहिले असता त्यामध्ये २ हजाराच्या नोटच्या कागदाची बंडले आढळून आली. त्यानुसार पथकाने सोमवारी सकाळी त्या हॉटेलवर छापा टाकून तिघांना अटक केली.महाराष्टÑ, कर्नाटक, गुजरात, दिल्लीमध्ये त्यांनी अशा प्रकारने अनेकांना लुबाडले असल्याचे उपायुक्त शहाजी उमाप यांनी सागिंतले. त्यांच्याकडून मुंबई व परिसरातील आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीArrestअटकMumbaiमुंबई