प्रज्ञासिंग ठाकूर यांना धमकीचे पत्र; नांदेडमधून डॉक्टरला अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: January 18, 2020 06:31 PM2020-01-18T18:31:51+5:302020-01-18T18:34:48+5:30
अटक केलेला आरोपी पेशाने डॉक्टर आहे.
मध्य प्रदेश - भाजपा खासदार प्रज्ञासिंग ठाकूर यांना धमकीचे पत्र पाठविणाऱ्यास नांदेडमधून अटक करण्यात मध्य प्रदेशएटीएसला पोलिसांना यश आले आहे. अटक केलेला आरोपी पेशाने डॉक्टर आहे. यापूर्वी देखील त्याने अनेक अधिकाऱ्यांना धमकी देणारी पत्रे पाठवली असल्याचे बोलले जात आहे. चौकशीत असे समोर आले आहे की, आरोपी जेव्हा जेव्हा एखाद्याला धमकी देणारे पत्र पोस्ट करायचे तेव्हा तो मोबाईल फोन घरीच सोडत असे.
मध्य प्रदेश एटीएसने गुरुवारी नांदेडमध्ये राहणारे डॉ. सय्यद अब्दुल रेहमान यांना ताब्यात घेतले. चौकशीनंतर एटीएसने शनिवारी प्रसारमाध्यमांना माहिती दिली आहे. अब्दुल रेहमान खान या ३५ वर्षीय डॉक्टरने प्रज्ञासिंगकडे संशयास्पद पत्र पाठवले. नांदेड जिल्ह्यातील धनेगाव येथे हा अटक डॉक्टर स्वत: चे क्लिनिक चालवतो.
Madhya Pradesh: Police has arrested one person from Maharashtra's Nanded, on charges of sending a suspicious letter to Bhopal MP, Pragya Singh Thakur. The accused is being taken to Bhopal for interrogation. More details awaited. pic.twitter.com/GEzegVrFh3
— ANI (@ANI) January 18, 2020
प्रसार माध्यमांशी बोलताना नांदेडमधील इतवारा पोलीस ठाण्याचे प्रभारी प्रदीप काकडे म्हणाले की, मध्य प्रदेश एटीएसने खासदार प्रज्ञासिंग ठाकूर यांना पाठवलेल्या पात्रांविषयी चौकशी सुरू केली. तेव्हा डॉ सय्यद अब्दुल रेहमान खान यांचे नाव पुढे आले. डॉक्टराने त्या पाठवलेल्या पत्रातून प्रज्ञासिंगला नरकात पाठवू अशी धमकी दिली होती.