राजस्थानच्या चुरू येथून एक क्लेषदायक घटना समोर आली आहे. एका वाहतूक पोलिसाला युवकाने धमकी दिल्यामुळे ते वाहतूक पोलीस धाय मोकलून रडल्याची घटना उघडकीस आली. या वाहतूक पोलिसाने रस्त्यात उभी असलेली एक लक्झरी कार हटविण्यास त्या युवकाला सांगितले होते. मात्र, ट्रॅफिक पोलिसाने आपल्याला कार हटविण्यास सांगितल्याने युवकाला संताप अनावर झाला. त्यात, रागातून त्याने पोलिस शिपायाला धमकी दिली. त्यामुळे, तो पोलीस हवादार रडू लागला.
ट्रॅफिक पोलीस आणि दुचाकीस्वार, कारचालक यांच्यात वादावादी ही निश्चितच बनली आहे. त्यामुळे, वाहतूक पोलीस आणि वाहनधारकांमध्ये सातत्याने अशा घटना घडत असतात. मात्र, राजस्थानमधील एका घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला असून ट्रॅफिक पोलिसालाच रडू कोसळले आहे. वाहतूक पोलिसाने एका अलिशान गाडीवाल्या युवकास गाडी रस्त्यातून हटविण्यास सांगितले होते. त्यावेळी, पोलिसाला कारचालकाने सुनावले. पुढे असलेला बसचालक तुझा जावई आहे का, असा प्रतिप्रश्न कारचालकाने वाहूतक पोलिसाला केला. त्यानंतर, अर्वाच्य भाषेत शिवीगाळही केली. त्यामुळे, वाहतूक पोलिसाला गर्दीतील लोकांसमोरच रडू कोसळले.
या ट्रॅफिक हवालदाराचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. त्यामध्ये, या युवकाने मंत्री महोदयाच्या नावाने हवालदाराला धमकी दिली. मंत्र्यांच्या बंगल्यावर ये, तुझी बदलीच करतो अशी धमकी दिल्याचे हवालदाराने रडू रडून सांगितल्याचे व्हिडिओत दिसून येते. दरम्यान, याप्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात केस दाखल करण्यात आली आहे. त्यानुसार, सरकारी कामात अडथळा निर्माण करणे आणि पोलीस कर्मचाऱ्याला धमकी दिल्याचा आरोप त्याच्यावर ठेवण्यात आला आहे.