अमरावती : गाडगेनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पंचवटी चौक स्थित लवाद न्यायाधिकरण येथे लवाद अधिकाऱ्याला शिवीगाळ करून जिवे मारण्याच्या धमक्या दिल्याप्रकरणी पुरुष व महिला यांच्याविरुद्ध भादंविचे कलम ३५३, २९४, ५०४ (ब) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. सात एप्रिल रोजी घडलेल्या या घटनेची तक्रार फिर्यादीने शनिवारी दिली.
तक्रारीनुसार, सिद्धार्थ विश्वनाथ रामटेके (४२) हे अमरावती येथील न्यायाधिकरणात लवाद अधिकारी आहेत. आरोपी रवींद्र पांडुरंग जरुदे (४२, रा. रविनगर, हनुमान मंदिराजवळ, अमरावती) व एक महिला ७ एप्रिल रोजी सकाळी साडेदहाच्या सुमारास न्यायाधिकरणात आले आणि न्यायदानाच्या कक्षात जबरीने प्रवेश करून, माझ्या केसचे काय झाले, असे म्हणून अश्लील शिवीगाळ करुन न्यायधीकरणास अपमानीत केले. लवादाचे न्यायीक कार्यवाहीत हेतुपुरस्सर अडथळा निर्माण केला.
कोवीड-19 चे प्रादुर्भावामुळे न्यायधीकरणाचे काम बंद असुन फक्त अती महत्वाच्या प्रकरणाची लवाद कार्यवाही सुरु असल्याचे गैर अर्जदाराला सांगीतले आसता, रवींद्र जरुदे याने न्यायाधीकरणाचे बाहेर पडुन परिसरामधे घाणेरड्या शिव्या देऊन जिवे मारण्याच्या धमक्या दिल्या तसेच महीलेने सुद्धा न्यायाधीकरणाच्या दरवाजाजवळ येवुन घाणेरड्या शिव्या देऊन जिवे मारण्याच्या धमक्या दिल्या. जर आमच्याविरुद्ध निकाल दिला तर पाहुन घेऊ. असे ते म्हणाले. दोन दिवस होम क्वाँरंटाईन राहिल्यानंतर सिद्धार्थ रामटेके यांनी 10 एप्रिल रोजी या प्रकरणाची गाडगेनगर पोलिस ठाण्यात नोंदविली. रवींद्र सरोदे ला अटक करण्यात आली आहेआरोपी क्रमांक 1 यास अटक केली आहे