शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

धावत्या वाहनांवर दगडफेक करणाऱ्या तिघांना अटक, पोलिसांची धडक कारवाई!

By अनिल गवई | Published: June 02, 2023 9:49 PM

सापळा रचून तीन आरोपींना पोलीसांनी अटक केली. मात्र, यातील एक आरोपी फरार होण्यात यशस्वी झाला.

खामगाव: दहशत माजवून चोरी, लुटमार करण्याच्या उद्देशाने धावत्या वाहनांवर दगडफेक करणाऱ्या तीन आरोपींच्या मुसक्या आवळ्यात ग्रामीण पोलिसांना अखेर शुक्रवारी यश आले. सापळा रचून तीन आरोपींना पोलीसांनी अटक केली. मात्र, यातील एक आरोपी फरार होण्यात यशस्वी झाला.

यासंदर्भात पोलीस सुत्रांनुसार मिळालेल्या माहितीनुसार, २९ मे च्या मध्यरात्री नवीन राष्ट्रीय महामागार्वरील माक्ता कोक्ता शिवारात आठ ते दहा वाहनांवर दगडफेक करण्यात आली होती. यात एका लक्झरी बससह आठ ते दहा प्रवासी वाहनांचे मोठे नुकसान झाले होते. दहशत माजवून चोरी आणि लुटमार करण्याच्या उद्देशाने झालेल्या या प्रकरणात १ जून रोजी जळगाव जामोद येथील डॉ. राजेंद्र नामदेवराव तानकर यांच्या तक्रारीवरून अज्ञात आरोपीविरोधात ग्रामीण पोलिसांनी भादंवि कलम ३५६, ३३६, ३३७, ३३८, ४२७, ३४ अन्वये तीन ते चार अनोळखी इसमा विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. 

तक्रारीत एमएच २८ व्ही ७४९४ क्रमाकांची कार दगडफेक करून आरोपींनी थांबविली. गाडीतील महिलांच्या अंगावरील लंपास करण्याच्या उद्देशाने दहशत माजविल्याचे नमूद केले. घटनेनंतर शहर पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले होते. दरम्यान, ग्रामीण पोलीस स्टेशनच्या हद्दीतील प्रकरण असल्याने, गुन्ह्याच्या पुढील तपासासाठी गुन्हा ग्रामीण पोलीस स्टेशनकडे वर्ग करण्यात आले.

सापळा रचून केली कारवाईग्रामीण पोलीसांनी आरोपींच्या गुन्हे करण्याच्या पध्दतीचा अभ्यास केला. खात्री पटल्यानंतर सापळा रचून गुप्त माहितीच्या आधारे आरोपींना हेरले. अप्पर पोलीस अधिक्षक अशोक थोरात, उपविभागीय पोलीस अधिकारी विनोद ठाकरे, ग्रामीण पोलीस स्टेशनचे निरिक्षक सुरेश नाईकनवरे यांच्या मार्गदर्शनात एपीआय रविंद्र लांडे, हेकॉ देवराव धांडे, पोकॉ अजय काळे यांच्या पथकाने तीन आरोपींच्या मुसक्या आवळल्या.

एक आरोपी फरारपोलीसांनी गजानन पांडुरंग सावरकर २२, सुधीर उपाख्य रिंकू विनायक ताठे २४, राजेश उपाख्य डोळ्या सुभाष पवार १८ यांना अकोला बायपासवरून ताब्यात घेतले. तर अनिकेत गणेश देशमुख फरार होण्यात यशस्वी झाला. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी