चिपळूण : गुहागर-चिपळूण मार्गावरील रामपूर घाटात मांडूळ जातीच्या सापाची तस्करीसाठी आलेल्या तीन जणांना शनिवारी सायंकाळी अटक करण्यात आली. त्यामुळे गुहागर, चिपळूणसह कोकणात खळबळ उडाली आहे.
तालुक्यातील गणेशखिंड ते रामपूर चिपळूण या मार्गावर मांडूळ जातीचा सापाची तस्करीसाठी मांडूळ जातीचा साप रिक्षा मध्ये घेवून काही व्यक्ती रामपूर बैंकरवाडी येथील एसटी बस थांब्याजवळ असलेबाबतचा संशय आल्याने त्यांची चौकशी केली. रिक्षामध्ये प्लॅस्टिक गोणपाटाच्या पिशवीमध्ये मांडूळ जातीचा साप दिसून आला. सदरचा साप व रिक्षासह महादेव जयराम महाडिक, अनिल तुकाराम कदम ( दोघेही रा. शिरवली ता. चिपळूण) रिक्षाचालक लक्ष्मण हिरू चाळके, रा. काविळतळी ता. चिपळूण यांना मुद्देमालासह ताब्यात घेतले.
या आरोपींवर वन्यजीव (संरक्षण) अधिनियम १९७२ चे कलम ९,३९,४८,५०,५१ अन्वये गुन्हा नोंद करणेत आलेला आहे. ही कारवाई दिपक खाडे, विभागीय वनअधिकारी, रत्नागिरी (चिपळूण) सचिन निलख, सहाय्यक वनसंरक्षक रत्नागिरी (चिपळूण) यांचे मार्गदर्शनाखाली परिक्षेत्र वनअधिकारी राजश्री कीर, परिमंडळ वनअधिकारी चिपळूण दौलत भोसले, परिमंडळ वनअधिकारी गुहागर संतोष परशेटये, वनरक्षक यशवंत सावर्डेकर, अरविंद मांडवकर, संजय दुंडगे यांनी केली, तर पुढील चौकशी परिक्षेत्र वनअधिकारी, चिपळूण यांचेमार्फत चालू आहे.