शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
2
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
3
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
4
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
5
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
6
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
7
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये
8
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य
9
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
10
रॅडिको कंपनीत स्टोरेज टाकीचा स्फोट; शेकडो टन मक्याखाली कामगार दबले, चौघांचा मृत्यू
11
पाकिस्तानला मोठा धक्का! चॅम्पियन्स ट्रॉफी घेऊन PoKमध्ये जायचं नाही, ICCने PCBला ठणकावलं!
12
देव तारी त्याला कोण मारी! चालत्या ट्रेनमधून पडलेल्या प्रवाशाचा आरपीएफ जवानाने वाचवला जीव
13
Raj Thackeray: राज ठाकरे भाषण न करताच भिवंडीतून परतले; प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
14
ट्रम्प विजयाबरोबरच सोन्याचे 'अच्छे दिन' संपले, दिसून आली 3 वर्षातील सर्वात मोठी घसरण! आता खरेदी करायला हवं की नको?
15
'चूक झाली, यापुढे इकडे-तिकडे जाणार नाही', सीएम नितीश कुमारांचा पीएम मोदींना शब्द
16
शशांक केतकर आणि मृणाल दुसानिस तब्बल ४ वर्षांनंतर पुन्हा एकत्र, त्यांची गाजलेली ही मालिका पुन्हा भेटीला
17
Maharashtra Election 2024: राहुल गांधींच्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी तीन घोषणा!
18
जाना था जापान, पहुंच गए चीन...! पंकजा मुंडेंसोबत असेच घडले, हेलिकॉप्टर सिडकोऐवजी सायखेड्याला पोहोचले
19
दोन 'गुलाब'रावांच्या हायव्होल्टेज लढतीत विजयाचा 'गुलाल' कोण उडवणार?
20
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्लेनमध्ये तांत्रिक बिघाड, देवघर एअरपोर्टवर थांबलं विमान

लोणी काळभोर येथे हल्ला करण्याच्या तयारीत असणाऱ्या तिघांना अटक 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 26, 2018 8:01 PM

हत्यारे बाळगून हल्ला करण्याच्या तयारीत असलेल्या तीन तरूणांना गुन्हे शोध पथकाने ताब्यात घेतले आहे.

ठळक मुद्देभारतीय हत्यार कायदा कलमान्वये गुन्हा दाखल करून अटक

लोणी काळभोर : बेकायदेशीररीत्या तलवार, कोयते असे प्राणघातक हत्यारे बाळगून कोणावर तरी हल्ला करण्याच्या तयारीत असलेल्या तीन तरूणांना गुन्हे शोध पथकाने ताब्यात घेतले आहे. त्यांच्यावर भारतीय हत्यार कायदा कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.        पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, याप्रकरणी आकाश प्रभाकर कांबळे ( वय २१ ), ॠषिकेश अनिल धेंडे ( वय २०, दोघे रा. इंदिरानगर झोपडपट्टी, जयभवानी चौक, लोणी स्टेशन, कदमवाकवस्ती, ता. हवेली.) व सागर सुरेश क्षत्रीय ( वय १९, रा. गल्ली क्रमांक १०, घोरपडेवस्ती, लोणी स्टेशन, कदमवाकवस्ती, ता. हवेली.) या तिन जनांना अटक करण्यात आली आहे.           २५ नोव्हेंबर रोजी सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवाजी ननवरे, पोलीस हवालदार समिर चमनशेख, सचिन मोरे हे खोले वस्ती येथे छत्रपती शिवराय कृती समितीचा एमआयटी विरोधातील बंदोबस्त पार पाडून पोलीस ठाण्यात आले होते. दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास ननवरे यांना कदमवाकवस्ती ग्रामपंचायत हद्दीतील इंदिरानगर झोपडपट्टीत असलेल्या पाण्याचे टाकी शेजारी आकाश कांबळे हा त्याचे दोन साथीदारांसमवेत थांबला आहे. त्यांच्याजवळ तलवार, कोयते अशी प्राणघातक हत्यारे असून ते कोणावर तरी हल्ला करण्याच्या तयारीत आहेत अशी माहिती खब-यांमार्फत मिळाली.           मिळालेल्या माहितीची शहनिशा करण्यासाठी पोलीस पथक गेले असता त्यांना अ‍ॅक्टीवा दुचाकी क्रमांक (एमएच.१२. एलवाय ५९८३) वर कांबळे बसलेला व त्यांचे शेजारी धांडे व क्षत्रिय हे दोघे तरूण ऊभे असलेले दिसले. तिघांना छापा मारून पकडून त्यांची अंगझडती घेतली असता आकाश कांबळे याचे हातात ६७ से.मी. लांब, २.५ से. मी. रूंदीची, टोकाकडे निमुळती होत गेलेली त्यास १२ से.मी. लांंबीची व  ३ से. मी. रूंदीची गोल वतुर्ळाकार मुुठ असलेली तलवार मिळून आली. सागर क्षत्रीय याचे हातात तर ॠषिकेश धेंडे याचे कमरेला लोखंडी कोयता मिळून आला. पोलीसांनी तिघांना सदर हत्यारे कशासाठी जवळ बाळगली याची विचारणा केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली.           त्यांचेकडे मिळून आलेली अ‍ॅक्टीवा दुचाकी व प्राणघातक हत्यारे जप्त करण्यात आली आहेत. व त्यांना भारतीय हत्यार कायदा कलमान्वये अटक गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे. 

 

टॅग्स :Loni Kalbhorलोणी काळभोरPuneपुणेPoliceपोलिसArrestअटक