केरळ: प्रार्थना स्थळामध्ये एकामागोमाग एक तीन बॉम्बस्फोट; एकाचा मृत्यू, २० जखमी

By ऑनलाइन लोकमत | Published: October 29, 2023 11:57 AM2023-10-29T11:57:50+5:302023-10-29T11:59:30+5:30

प्रार्थना सभेमध्ये एकामागोमाग एक असे तीन स्फोट झाले. या घटनेची माहिती मिळताच एनआयएची टीम रवाना झाली आहे. 

Three consecutive bomb blasts, Explosion At Convention Centre In Ernakulam, Kerala; Terror Attack Suspected, 1 died, 20 injured | केरळ: प्रार्थना स्थळामध्ये एकामागोमाग एक तीन बॉम्बस्फोट; एकाचा मृत्यू, २० जखमी

केरळ: प्रार्थना स्थळामध्ये एकामागोमाग एक तीन बॉम्बस्फोट; एकाचा मृत्यू, २० जखमी

केरळमधील एर्नाकुलमच्या कलामासेरी येथील एका प्रार्थना सभेवेळी झालेल्या बॉम्बस्फोटात एक जण ठार तर २० जण जखमी झाले आहेत. प्रार्थना सभेमध्ये एकामागोमाग एक असे तीन स्फोट झाले. या घटनेची माहिती मिळताच एनआयएची टीम रवाना झाली आहे. 

हॉलच्या मध्यभागी हा स्फोट झाला. मला तीन स्फोटांचे आवाज ऐकू आले. मी मागे होतो. तेथे धुराचे लोट होते. एका महिलेचाही मृत्यू झाल्याचे मी ऐकले आहे, असे प्रत्यक्षदर्शीने माध्यमांना सांगितले आहे. दहशतवादी हल्ल्याची शक्यता देखील पडताळून पाहिली जात आहे. 

या स्फोटांवर मुख्यमंत्री पिनराई विजयन यांची प्रतिक्रिया आली आहे. ही अत्यंत दुर्दैवी घटना आहे. आम्ही घटनेचा तपशील गोळा करत आहोत. एर्नाकुलममध्ये सर्व उच्चपदस्थ अधिकारी उपस्थित आहेत. डीजीपी घटनास्थळी जात आहेत.सध्या एकाचा मृत्यू झाला असून दोन जणांची प्रकृती चिंताजनक आहे. काहींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, असे विजयन म्हणाले. 

एनआयएचे ४ अधिकाऱ्यांचे पथक घटनास्थळी जाण्यास कोचीहून निघाले आहे. कन्व्हेन्शन सेंटरमध्ये आयोजित तीन दिवसीय कार्यक्रमाचा आज शेवटचा दिवस होता. स्फोटाच्या वेळी 100-150 लोक तिथे हजर होते. सकाळी 9 च्या सुमारास हे स्फोट झाल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. 
 

Web Title: Three consecutive bomb blasts, Explosion At Convention Centre In Ernakulam, Kerala; Terror Attack Suspected, 1 died, 20 injured

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.