पुणे : वाहन चोरीचा उच्चशिक्षित म्होरक्या गजाआड असल्याने त्याच्या टोळीतील सदस्यांना पैशाची गरज भासल्याने वाहने चोरून विक्री करण्यास निघालेल्या टोळीला हडपसर पोलिसांनी अटक केली़ त्यांच्याकडून १३ लाख रुपयांची ३२ दुचाकी वाहने व इतर वाहनांचे सुट्टे पार्ट जप्त करण्यात आले आहेत़अविनाश शिंदे (वय २६, रा़ ढमाळवाडी, फुरसुंगी, ता. हवेली), शौर्य रनपालसिंग चौधरी उर्फ पुलकित (वय २५, रा. गोकूळनगर, कात्रज रोड, कोंढवा, मूळ गाजीयाबाद) आणि मोहम्मद इक्बाल शेख (वय २०, रा. कृष्णानगर, मोहम्मदवाडी) असे अटक केलेल्या तिघांची नावे आहेत. टोळीप्रमुख गौरव राजकुमार शर्मा (वय ३०, रा. कोेंढवा बुद्रुक) याला खडक पोलिसांनी यापूर्वी अटक केली आहे; तसेच त्याच्याकडून ७ वाहनचोरीचे गुन्हे उघडकीस आणले आहेत.याबाबत पोलिसांनी सांगितले की, हडपसर परिसरात वाहनचोरी करणाऱ्या युवकांची माहिती पथकातील पोलीस शिपाई अकबर शेख आणि नितीन मुंढे यांना मिळाली. त्यानुसार १६ मार्च रोजी चोरीच्या वाहनांवर फिरताना शौर्य चौधरी, मोहम्मद शेख आणि अविनाश शिंदे यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे चौकशी केली असता, टोळीप्रमुख गौरव शर्माच्या मदतीने त्यांनी वाहन चोरी केल्याची कबुली दिली़ पुणे शहरातील १८ गुन्हे, सोलापूर ग्रामीण मधील २ गुन्हे, पुणे ग्रामीण मधील ८ गुन्हे, तर पिंपरी-चिंचवड परिसरातील ३ आणि परभणी जिल्ह्यातील १, असे एकूण ३२ गुन्हे उघड केले. पोलिसांनी त्यांच्याकडून १३ लाख ५ हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे.पोलीस उपायुक्त प्रकाश गायकवाड, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील तांबे, पोलीस निरीक्षक हमराज कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक संजय चव्हाण, लोणारे, कर्मचारी युसूफ पठाण, सोमनाथ सुतार, राजेश नवले, प्रताप गायकवाड, प्रमोद टिळेकर, विनोद शिवले, सैदोबा भोजराव, राजू वेगरे, गणेश दळवी, नितीन मुंढे, अकबर शेख, गोविंद चिवळे, शशिकांत नाळे, कांबळे यांनी ही कामगिरी केली़सुटे पाटर््स तयार करून त्याची बाजारात विक्री१ आरोपी गौरव हा मूळचा उत्तर प्रदेश येथील आहे. तो पदवीधर असून, हॉटेल मॅनेजमेंटचे शिक्षण घेतले आहे. पुण्यात त्याने काही हॉटेलमध्ये नोकरीही केली आहे. कमी श्रमात, जास्त पैसा कमाविण्याच्या हव्यासापोटी त्याने शहरात वाहनचोºया करायला सुरुवात केली; तसेच वाहनचोरीमध्ये पकडले जाऊ नये, यासाठी त्याने चोरलेल्या दुचाकींचे सुटे पाटर््स तयार करून त्याची बाजारात विक्री केली आहे.२ गौरव आणि शौर्य हे दोघे मूळचे उत्तर प्रदेशचे असून बालपणीचे मित्र आहेत. शौर्य हा मूळचा गाजियाबादचा असून पेंटिगचे कामे करतो. तर मोहम्मदबिल शेख हा दिल्ली येथील असून नाना पेठेत मॅकेनिकचे काम करीत होता. गौरवने त्यांना जादा पैशांचे आमिष दाखवून त्यांना पुण्यात बोलवून घेतले आणि टोळी तयार केली.
वाहनचोरी करणाऱ्या टोळीतील तिघांना अटक, ३२ गुन्हे उघडकीस
By ऑनलाइन लोकमत | Published: March 19, 2019 3:20 AM