शहरं
Join us  
Trending Stories
1
लक्ष्मण हाकेंकडून मद्यप्राशन करून शिविगाळ, मराठा आंदोलकांचा आरोप, पुण्यात तणाव  
2
'दहशतवादाला कुठेही जागा नाही', युद्धाच्या पार्श्वभूमीवर PM मोदींची नेतन्याहूंशी फोनवर चर्चा...
3
"उद्धव ठाकरेंनी आमच्यावर टीका करताना आरसा बघावा", देवेंद्र फडणवीस यांचा टोला
4
बंडखोरी, मुख्यमंत्रिपदावरील दावेदारीसह या ४ मुद्यांनी हरियाणात वाढवलंय भाजपा, काँग्रेसचं टेन्शन
5
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे पैसे लाटणाऱ्यांवर काय कारवाई होणार? मंत्री अदिती तटकरे म्हणाल्या...
6
"राहुल निरागस, स्वतःला फॅन्टम समजतात; त्यांनी...", हिमंता बिस्वा सरमांची बोचरी टीका
7
आता कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या ईडीच्या निशाण्यावर! MUDA घोटाळ्याप्रकरणी PMLA अंतर्गत FIR दाखल
8
राहुल गांधी ४,५ ऑक्टोबरला महाराष्ट्रात; छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळयाचे करणार अनावरण
9
Akola: मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री हरवले आहेत, अकोल्यात कॉग्रेसचे अनोखे आंदोलन
10
"दम असेल तर उद्धव ठाकरेंनी फडणवीसांविरोधात निवडणूक लढावी", फडणवीसांचे निकटवर्तीय जोशींचे आव्हान
11
इलेक्टोरल बाँड खंडणी प्रकरणात अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना दिलासा, उच्च न्यायालयाकडून तपासाला स्थगिती
12
विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसचे उमेदवार कसे निवडले जाणार? पक्षश्रेष्ठींनी ठरवला 'मास्टरप्लॅन'
13
विमान अपहरणानंतर वाटाघाटींसाठी गेलेल्या जसवंत सिंहांच्या लाल सुटकेसमध्ये काय होतं? २५ वर्षांनंतर मुलाने केला मोठा गौप्यस्फोट  
14
अवघ्या २३ धावा, ३ षटकार; तरीही रोहितने केली 'मास्टरब्लास्टर'ची बरोबरी, काय केला पराक्रम?
15
"हा 'पंढरी' कायम चालत राहील आणि...", पॅडी कांबळेची पोस्ट चर्चेत
16
पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी ठाणे जिल्हा दौऱ्यावर; अधिकाऱ्यांनी घेतली पूर्वतयारी आढावा बैठक! 
17
अपक्ष निवडणूक लढवतेय देशातील सर्वात श्रीमंत महिला; मुलगा प्रचारापासून लांब तर सून मैदानात
18
नोकरी सोडून गेलेल्या कर्मचाऱ्याला Google ने परत बोलावले; पगार तब्बल 22,000 कोटी रुपये!
19
युवासेनेच्या आनंदावर विरजण? ‘पिक्चर अभी बाकी है’ म्हणत सिनेट निकालाला हायकोर्टात आव्हान
20
"ब्राह्मणांना मारून योगीं आदित्यनाथ...!"; हे काय बोलून गेले काँग्रेस नेते रणदीप सिंह सुरजेवाला?

Crime News: बापरे! चौघांकडून तीन किलो सोने, २७ किलो चांदी जप्त

By ऑनलाइन लोकमत | Published: March 06, 2022 7:35 AM

सव्वा दोन कोटींच्या मुद्देमालासह रेल्वे सुरक्षा बलाने आवळल्या मुसक्या

लोकमत न्यूज नेटवर्कबल्लारपूर (जि. चंद्रपूर) : बल्लारशाह रेल्वेस्थानकावर सकाळी म्हैसूर ते दरभंगाकडे जाणाऱ्या १२,५७८ या दरभंगा बागमती एक्स्प्रेसमध्ये चार संशयित युवकांना ताब्यात घेऊन त्याची झडती घेतली असता त्यांच्याजवळ तब्बल ३ किलो ७१० ग्रॅम सोने (किमत १ कोटी ७६ लाख ८३१ रुपये), २७ किलो चांदी (किंमत १९ लाख  ५८ हजार ४० रुपये) व १४ लाख ५२ हजार १०० रुपये रोख असा एकूण तब्बल २ कोटी १० लाख ६७ हजार ९७१ रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला. अटक करण्यात आलेले चारही आरोपी बिहार राज्यातील आहेत. 

महताब आलम अयुब खान (३७), बदरुल जहाँगीर खान (२०), मोहम्मद सुभान अब्दुल वाहिब (३०) व दिलकस मोहम्मद आरीफ (२०, सर्व रा. अरेरिया) अशी आरोपींची नावे आहेत. तामिळनाडू त्रिपूर येथे एका सोन्या-चांदीच्या दुकानात दरोडा घालून चार युवक दरभंगा बागमती एक्स्प्रेसने दरभंगाकडे पळून जात असल्याची माहिती बल्लारशाह रेल्वे सुरक्षा बलाने वरिष्ठ सुरक्षा आयुक्त नागपूर यांच्याकडून वरिष्ठ मंडळ सुरक्षा आयुक्त आशुतोष पांडे यांना मिळाली. या आधारावर ही रेल्वेगाडी बल्लारशाह रेल्वेस्थानकावर येताच सापळा रचून करण्यात आली. 

प्लॅटफार्म क्रमांक ५ वर हे चारही आरोपीला बोगी क्रमांक ७, ९ व एसी बोगी क्रमांक ३ मधून प्रवास करीत होते. पकडले जाऊ नये, म्हणून त्यांनी मुद्देमाल वेगवेगळ्या बोगींमध्ये सीटखाली बॅग्ज व गोणींमध्ये लपवून ठेवला होता. ही कारवाई रेल्वे सुरक्षा बलाचे पोलीस निरीक्षक महेंद्रकुमार मिश्रा, नवीनप्रताप सिंग, उपनिरीक्षक प्रवीण महाजन, प्रवीण गाडवे, सहायक डी. के. गौतम, राम लखन, तसेच रामवीर सिंग, डी. एच. डुबल आणि त्यांच्या पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली. यावेळी एक आरोपी पळून जात होता. त्याला धावून शिताफीने पकडले. हा सगळा प्रकार रेल्वेतील स्थानकावरील प्रवासी बघत होते.

आरोपींना  तामिळनाडूकडे सुपूर्द करणारहे सर्व आरोपी त्रिपूर येथे दरोडा घालून बिहारकडे दरभंगा बागमती एक्स्प्रेसने पळून जात होते. घटनास्थळी सीसीटीव्ही फुटेजमध्ये आरोपींची ओळख पटताच त्रिपूर पोलिसांनी सूत्र हलविले. यानंतर पोलीस आरोपींच्या मागावर होते. दरम्यान, हे चारही आरोपी दरभंगा एक्स्प्रेसने जात असल्याची माहिती रेल्वे सुरक्षा बलाला मिळाली. त्यांना आता तामिळनाडू पोलिसांकडे सुपूर्द करण्यात येणार आहे.