शहरं
Join us  
Trending Stories
1
माझ्याकडे महाराष्ट्राचे सत्यात उतरणारे स्वप्न, माझा कम्फर्ट भाजपसोबत; राज ठाकरेंनी मांडली रोखठोक भूमिका
2
मराठा समाजाची कांड्यांवर मोजण्याइतकी आहेत मतं; भाजपच्या बबनराव लोणीकरांचे वादग्रस्त वक्तव्य
3
शिवाजी पार्कवर उद्धवसेना, मनसेची सभा होणार?; नगरविकास खात्याच्या निर्णयाकडे लक्ष
4
जगातले दुश्मन एकत्र येतात तर आम्ही एकत्र येण्यावर चर्चा तर हवी; 'लोकमत'च्या मुलाखतीत राज ठाकरेंचं वक्तव्य
5
भाजपच्या बंडखोर उमेदवाराचा शिंदेसेनेच्या उमेदवाराला पाठिंबा
6
उठा उठा थंडी आली, स्वेटर घालायची वेळ झाली; मुंबई २० अंशांवर, राज्यात थंडीचा कडाका होतोय सुरू!
7
२० वर्षांत मतदार नेमके कुणाकडे गेले? २००४ ते २०१९ मध्ये काय घडलं?; जाणून घ्या आकडेवारी
8
२ हजारांहून अधिक मतदार सध्या कामानिमित्त परदेशात
9
दिव्यांग, ज्येष्ठांना मतदानाला आणण्यासाठी विशेष सोय; सक्षम ॲपवर नाव नोंदवण्याचे आवाहन
10
"कुणाला काय विचारावं हे पण उद्धव ठाकरेंना माहिती नाही"; राज ठाकरेंची बोचरी टीका
11
भाजपच्या सभेत मिथुन चक्रवर्तींचे पाकिट चोरले; स्थानिक नेत्यांची चोराला अपील, व्हिडिओ व्हायरल
12
"५ वर्षापूर्वी अमित शाह, शरद पवार अन् गौतम अदानी..."; अजित पवारांचा गौप्यस्फोट
13
“उद्धव ठाकरेंच्या बॅगेत असे काय आहे? एवढी आगपाखड करायचे कारण काय?”; शिंदे गटाने डिवचले
14
"समजूत काढायला गेले अन् तिथेच बसले"; येवल्यात भुजबळांवर शरद पवारांचा हल्लाबोल
15
Shocking! एक कार शेकडोंच्या गर्दीत घुसली; 35 जणांचा मृत्यू, ४३ जखमी, ड्रायव्हर कोमात
16
डोनाल्ड ट्रम्प यांनी कुणाला बनवलं NSA? नाव जाणून पाकिस्तानलाही धढकी भरेल; भारतासाठी आहेत खास!
17
किरकोळ महागाई RBI च्या हाताबाहेर गेली; रेपो रेटमध्ये कपात होणे शक्य नाही?
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : मुख्यमंत्रिपदावरुन महाविकास आघाडीमध्ये वाद? उद्धव ठाकरेंनी एका शब्दात विषयच संपवला
19
महाराष्ट्रातील निवडणुकीसाठी काँग्रेसचा 'मेगा प्लॅन'! पुढच्या ६ दिवसांत काय करणार? २ गोष्टींवर असेल सर्वधिक फोकस
20
“मविआ सत्तेत आल्यास शेतकरी कर्जमाफी, महिलांना खटाखट ३ हजार देऊ”; राहुल गांधींची गॅरंटी

मृतदेहाचा हात बाहेर आल्याने तिघे जेरबंद; जाचाला कंटाळून मालकाची हत्या

By ऑनलाइन लोकमत | Published: April 14, 2023 6:20 AM

मालकाच्या त्रासाला कंटाळून नोकराने दाेन साथीदारांच्या मदतीने मालकाची हत्या केली.

कल्याण :

मालकाच्या त्रासाला कंटाळून नोकराने दाेन साथीदारांच्या मदतीने मालकाची हत्या केली. हत्या केल्यानंतर  मालकाचा मृतदेह पुरला. त्यावर मेलेल्या म्हशीचा मृतदेह ठेवला. मात्र, दोन दिवसांनी पुरलेला मृतदेह  फुगून मृतदेहाचा हात बाहेर आला आणि हत्येचा उलगडा झाला. टिटवाळा पाेलिसांनी हत्या करणाऱ्या नाेकरासह त्याच्या दाेन साथीदारांना अटक केली आहे. मालकाची हत्या करणाऱ्या नाेकराचे नाव  सुनील माैर्या आहे तर त्याच्या  साथीदाराची नावे  शुभम गुप्ता आणि अभिषेक मिश्रा अशी आहेत.  हत्या झालेल्या मालकाचे नाव सचिन माम्हाणे असे हाेते. 

टिटवाळा परिसरात राहणाऱ्या सचिनच्या पत्नीचे  इन्व्हर्टर आणि इलेक्ट्रिकचे दुकान आहे. ७ एप्रिलला सचिन कामानिमित्त बाहेर गेला, ताे घरी परतलाच नाही. सचिन बेपत्ता झाल्याची तक्रार त्याच्या कुटुंबीयांनी टिटवाळा पाेलिस ठाण्यात दिली.  दहागाव-बदलापूर रोडवर  सचिन यांची गाडी तोडफोड झालेल्या अवस्थेत आढळून आली. याची माहिती पाेलिसांना मिळताच, त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. सचिनचा मृतदेह दहागावनजीक निर्जनस्थळी आढळून आला. त्याची ओढणीने गळा आवळून हत्या करण्यात आली हाेती. मात्र, हत्या का व काेणी केली याचा उलगडा झाला नाही.  वरिष्ठ पोलिस निरीक्षक जितेंद्र ठाकूर आणि गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सहायक पोलिस निरीक्षक संदीप शिंदे यांच्या पथकाने या गुन्ह्याचा तपास केला. दुकानात काम करीत असलेला सुनील मौर्या याने त्याचे साथीदार  अभिषेक मिश्रा आणि शुभम गुप्ता यांच्या मदतीने सचिनची हत्या केल्याचे उघड झाले. पोलिसांनी तत्काळ या तिघांचा माग काढत त्यांना बेड्या ठोकल्या.

कशी केली हत्या...- सायंकाळच्या सुमारास सचिनची पत्नी दुकानात येत असे. सुनील आपल्या पत्नीकडे वाईट नजरेने पाहतो, असा संशय सचिनला होता. याच संशयातून सचिन सातत्याने सुनीलवर चिडत हाेता. त्याचबराेबर कामावरून काढून टाकण्याची धमकी देत हाेता. त्यामुळे सुनील संतापला. - अखेर त्याने सचिनच्या हत्येचा कट  रचला. शुभम व अभिषेक या दोन साथीदारांना सोबत घेतले. टिटवाळाजवळ दहागाव येथे एका फार्महाऊसमध्ये काम करायचे आहे, असा बहाणा करत सचिनला दहागाव येथे आणले. - जंगलात पोहोचताच तिघांनी  गळा आवळून सचिनची हत्या केली. त्यानंतर मृतदेह पुरला. संशय येऊ नये म्हणून सोबत पालापाचोळा टाकून मेलेल्या म्हशीचे अवशेष पुरले.  सचिनची गाडी आढळली. पोलिसांनी शोध घेतला असता, त्यांना सचिनचा जमिनीतून बाहेर आलेला हात दिसला. त्यामुळे गुन्हा उघड झाला.