शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
2
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् मोठ्या तोंडाने सांगतात..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
3
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
4
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
5
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
6
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
7
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
8
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
9
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
10
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
11
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
12
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये
13
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य
14
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
15
रॅडिको कंपनीत स्टोरेज टाकीचा स्फोट; शेकडो टन मक्याखाली कामगार दबले, चौघांचा मृत्यू
16
पाकिस्तानला मोठा धक्का! चॅम्पियन्स ट्रॉफी घेऊन PoKमध्ये जायचं नाही, ICCने PCBला ठणकावलं!
17
देव तारी त्याला कोण मारी! चालत्या ट्रेनमधून पडलेल्या प्रवाशाचा आरपीएफ जवानाने वाचवला जीव
18
Raj Thackeray: राज ठाकरे भाषण न करताच भिवंडीतून परतले; प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
19
ट्रम्प विजयाबरोबरच सोन्याचे 'अच्छे दिन' संपले, दिसून आली 3 वर्षातील सर्वात मोठी घसरण! आता खरेदी करायला हवं की नको?
20
'चूक झाली, यापुढे इकडे-तिकडे जाणार नाही', सीएम नितीश कुमारांचा पीएम मोदींना शब्द

पुरंदर किल्ल्यावरून सिमेंट मिक्सरचा ट्रक खाली कोसळून तीन जणांचा मृत्यू ; दोघे जण जखमी

By ऑनलाइन लोकमत | Published: April 18, 2019 7:22 PM

पुरंदर किल्ला येथे (ता. पुरंदर) येथे सिमेंट मिक्सर ग्राईंडर किल्ल्यावरून कोसळल्याने तीन जणांचा मृत्यू झाला तर ०२ जण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे.

सासवड : घेरा पुरंदर (ता. पुरंदर) येथील पुरंदर किल्ल्याच्या तळ्याच्या दुरुस्तीचे काम सुरू असून ते सुरू असताना काँक्रीट वाहणारा सिमेंट मिक्सरचा ट्रक किल्ल्यावर नेताना चालकाचा ताबा सुटल्याने खाली कोसळला. या घटनेत तिघांचा मृत्यू झाला असून दोघे गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना बुधवारी (दि. १७) सायंकाळी ५.४५ वाजता घडली. या प्रकरणी ट्रकचालकवार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, याबाबत प्रशांत भुजीगा धुळूगंडे (वय २८, रा. मु. पो. सुळकुड, ता. कागल, जि. कोल्हापूर) यांनी फिर्याद दिली आहे. या घटनेत आनंद कंपनी  (वय २०, रा. दिलवाले वॉर्ड नंबर ५ विद्यालयाजवळ पो. करवाही, ता. म्हणशील, जि. सिद्धी, मध्य प्रदेश), मोनो रमेश बैगा (वय २१, रा. वॉर्ड नंबर ३ चहाही नगर परिषद मजीवली, ता. थाना, जि. मजीवली, मध्य प्रदेश), अनिल ब्रिजनंदन पनिका (वय २१, रा. कुशमहर, ता. सिद्धी, मध्य प्रदेश) यांचा जागीच मृत्यू झाला. तर, रामबहर भवर बैगा (वय १९, रा. चरणी, पो. कुशमहर, ता. रामपूर, जि. सिद्धी, मध्य प्रदेश), राजकुमार रामकरण विश्वकर्मा (वय २३, धंदा-चालक, रा. घर नंबर २३, हाटवा, बरहटोला, पो. हाटवाखास, ता. सिहवल, जि. सिद्धी, मध्य प्रदेश) हे दोघे गंभीर झाले आहेत.  या प्रकरणी मिस्कर ट्रकचालक राजकुमार रामकरण विश्वकर्मा (वय २३, रा. घर नंबर २३ हाटवा, बरहटोला पो. हाटवाखास, ता. सिहवल, जि. सिद्धी मध्य प्रदेश) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुरंदर किल्ला हा लष्कराच्या ताब्यात आहे. किल्ल्यावरील तळ्याची दुरुस्ती करण्याचे काम सध्या सुरू आहे. यासाठी लागणारे काँक्रीट किल्ल्यावर नेले जात होते. या वेळी  ट्रकचालक विश्वकर्मा याने माल भरून किल्ल्याच्या मुख्य प्रवेशद्वारावरवर असणाऱ्या बंचिंग प्लांटवरून काँक्रीट भरून किल्ल्यावरील मुरारबाजी चौकात असणाऱ्या तलावांमध्ये भरण्यासाठी निघाला. या वेळी किल्ल्यावरील चौकातून वाहन वळवून मुख्य प्रवेशद्वाराकडे जात असताना चालकाचा ट्रकवरील  ताबा सुटून मिक्सर ट्रक मागे आला आणि दरीमध्ये सुमारे २० फूट खोल कोसळला. या वेळी चालकाने ट्रकमधून बाहेर उडी मारल्याने तो बचावला. मात्र, मिक्सरच्या मागे असलेल्या तीन कामगारांच्या अंगावरून ट्रक खाली कोसळल्याने त्यांचा मृत्यू झाला. तर दोघे गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना सासवड ग्रामीण रुग्णालयात उपचार करण्यासाठी दाखल केले असून, त्यांची प्रकृती स्थिर आहे.  पो.नि. ए. बी. घोलप यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक एस. एन. महाजन पुढील तपास करीत आहे.

टॅग्स :PuneपुणेPurandarपुरंदरDeathमृत्यूPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारी