मीरारोड - मीरारोडच्या शांती नगर भागातील सराफा दुकानावर भरदिवसा सशस्त्र दरोडा टाकणाऱ्या पैकी उत्तर प्रदेशातून ३ दरोडेखोरांच्या मुसक्या मीरा भाईंदर - वसई विरार पोलीस आयुक्तालयाच्या गुन्हे शाखेने आवळल्या आहेत. त्यांच्याकडून देशी कट्टा,जिवंत काडतुसे, मोबाईल, ३५ लाखाचे दागिने व रोख १ लाख रुपये जप्त करण्यात आले आहेत. शांतीनगर सेक्टर ५ मध्ये वर्दळीच्या ठिकाणी असलेल्या एस. कुमार गोल्ड अँड डायमंड ज्वेलरी ह्या सराफा दुकानात ७ जानेवारी रोजी दुपारी २ च्या सुमारास ग्राहक बनून आलेल्या ४ दरोडेखोरांनी आतील कर्मचाऱ्यांना बंदुकीचा धाक दाखवून १ कोटी ५४ लाखांचे दागिने लुटून पसार झाले होते. एका दुचाकीवर दोन दरोडेखोर पसार झाले तर दोन दरोडेखोरांना त्यांची दुचाकी सुरु न झाल्याने ती तेथेच टाकून पळावे लागले होते .पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे दरोडेखोरांचा शोध सुरु केला . सापडलेली दुचाकी हि नालासोपारा येथून चोरीला गेल्याचे उघड झाले होते . पोलीस आयुक्त सदानंद दाते व अतिरिक्त पोलीस आयुक्त एस.जयकुमार यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक जितेंद्र व्हनकोटी व प्रमोद बडाख, सपोनि विलास कुटे सह अर्जुन जाधव संजय शिंदे ,अशोक पाटील, राजू तांबे, जनार्दन मते, पुष्पेन्द्र थापा , सचिन सावंत, मनोज चव्हाण, मनोज सपकाळ,शिवा पाटील, राजेश श्रीवास्तव, गोविंद केंद्रे यांचे पथक हे गेल्या अनेक दिवसां पासून उत्तर प्रदेशात दरोडेखोरांच्या शोधात होते.स्थानिक गुन्हे शाखेच्या पथका सोबत उत्तर प्रदेश पोलिसांची स्पेशल टास्क फोर्स टीम दरोडेखोरांचा आझमगढ, जौनपूर, गाझीपूर व लखनऊ भागात शोध घेत होते . अखेर बुधवारी पोलिसांना लखनऊ भागातून ३ दरोडेखोरांना पकडण्यात यश आले.विनय कुमार सिंह उर्फ सिंतु सिंह (४७) रा.तारीघाट, जिल्हा-गाझिपुर, शैलेंद्र मुरारी मिश्रा (४२) रा. कटारि सिहुलीया, जिल्हा;वाराणसी व दिनेश कलऊ निषाद (२४) रा.सरोज बडेवार, जिल्हा - जौनपूर अशी अटक केलेल्या तिघाज दरोडेखोरांची नावे आहेत . तिघेही दरोडेखोर उत्तर प्रदेशचे असून त्यांच्यावर हत्या , हत्येचा प्रयत्न , दरोडा, खंडणी, अपहरण, बेकायदा शस्त्र बाळगणे आदी गंभीर गुन्हे दाखल आहेत. सदर दरोड्यातील आणखी २ आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत.
भरदिवसा बंदुकीच्या धाकावर सराफाचे दुकान लुटणाऱ्या ३ दरोडेखोरांना उत्तर प्रदेशमधून अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: January 27, 2021 9:19 PM
Dacoity : त्यांच्याकडून देशी कट्टा,जिवंत काडतुसे, मोबाईल, ३५ लाखाचे दागिने व रोख १ लाख रुपये जप्त करण्यात आले आहेत.
ठळक मुद्देशांतीनगर सेक्टर ५ मध्ये वर्दळीच्या ठिकाणी असलेल्या एस. कुमार गोल्ड अँड डायमंड ज्वेलरी ह्या सराफा दुकानात ७ जानेवारी रोजी दुपारी २ च्या सुमारास ग्राहक बनून आलेल्या ४ दरोडेखोरांनी आतील कर्मचाऱ्यांना बंदुकीचा धाक दाखवून १ कोटी ५४ लाखांचे दागिने लुटून पसार झा