नवी दिल्ली - पैसे उकळण्यासाठी एका ज्येष्ठ नागरिकावर जबरदस्ती केल्याचा खोटा आरोप करणाऱ्या तीन महिलांना पोलिसांनी अटक केली आहे. पश्चिम दिल्ली जिल्ह्यातील राजौरी गार्डन ठाणे पोलिसांच्या पथकाने मोठी कारवाई करत या तीन महिलांना बेड्या ठोकल्या आहेत. या महिला ज्येष्ठ नागरिक आणि श्रीमंत लोकांवर जबदरस्तीने सेक्स केल्याचा आरोप करत आणि त्यांच्याकडून पैसे उकळत असत. मात्र संबंधित ज्येष्ठ नागरिक तसेच इतर पीडित बदनामीच्या भीतीने या प्रकाराची कुठेही वाच्यता न करता गुपचूप पैसे देत असत. ( three women arrested for extorting money from Senior citizen )या विभागाचे एसीपी आणि राजौरी गार्डन पोलीस ठाण्याचे एसएचओ अनिल शर्मा यांच्या नेतृत्वाखालील पथकाने या प्रकरणाची तक्कार आल्यानंतर तपास सुरू केला. तसेच कशून शोध घेत तीन महिलांना बेड्या ठोकल्या. पूनम, सोनिया आणि किरण अशी या आरोपी महिलांची नावे आहेत. पश्चिम दिल्लीच्या डीसीपींनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी पूनम आणि सोनिया या दोघी सख्ख्या बहिणी आहेत. दोघीही मुळच्या गुजरातमधील आहेत. त्या दोघीही विवाहित आहेत. मात्र दोघींनी आपापल्या पतींना घटस्फोट दिला असून त्या वेगळ्या राहत आहेत. दरम्यान, झटपट पैसा कमावण्यासाठी त्यांनी सेक्सच्या धंद्यात उडी घेतली आणि आपली टोळी बनवली. या दरम्यान, त्यांनी पैसेवाल्या ज्येष्ठ नागरिकांना हेरून त्यांच्यावर जबरदस्तीचा आरोप करून पैसे उकळण्यास सुरुवात केली.
तिसरी आरोपी असलेल्या किरण हिचा वापर पीडिता म्हणून केला जात असे. तर हेरलेल्या सावजाकडून पैसे वसुल करण्यासाठी त्याला घाबरवले जात असे. महिलांवर अत्याचाराचे प्रकरण असल्याचे सांगून कारवाईची भीती दाखवली जाई. त्यामुळे लोक घाबरून पैसे देत असत.