नालासोपारा (मंगेश कराळे) :- शहरातील हनुमान नगर परिसरातील एका इमारतीत सुरू असलेल्या वैश्याव्यवसायातून युगांडा देशातील तीन पीडित महिलांची नालासोपाऱ्याच्या अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंंध कक्षाच्या पथकाने कारवाई करून सुटका करण्यात आल्याची माहिती जनसंपर्क अधिकारी प्रवीण बनगोसावी यांनी शनिवारी दिली आहे.
हनुमान नगरच्या सिल्वर प्लाझा बिल्डिंगमध्ये आरोपी वेश्यादलाल महिला तीचे राहते घरी वेश्याव्यवसाकरीता मुली पुरविणार असल्याची गोपनीय माहिती नालासोपाऱ्याच्या अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंंध कक्षाचे पोलीस निरीक्षक संतोष चौधरी यांना मिळाली होती. आरोपी महिलेच्या मोबाईल नंबरद्वारे कॉल करून वेश्यागमनासाठी मुलीची मागणी केली. पोलिसांनी बोगस गिऱ्हाईक पाठवून त्याने इशारा दिल्यानंतर पोलिसांनी पथकासह व पंचासह शुक्रवारी संध्याकाळी छापा मारला. महिला आरोपी वेश्यादलाल सिलीया लिंडा (३१) हिला अटक करुन तीन युगांडा देशातील पीडित महिलांची सुटका करण्यात आली आहे. आरोपी महिलेने पिडीत महिलांना पैशाचे आमिष दाखवुन वेगवेगळया ग्राहकांना बोलावुन त्यांचेकडुन पैसे घेवुन पिडीत महिलांना वेश्याव्यवसाय करण्यास लावायची. आरोपी महिलेवर नालासोपारा पोलीस ठाण्यात पिटा आणि अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंध कायदयानुसार गुन्हा दाखल केला आहे.
सदरची कारवाई ही पोलीस उपायुक्त (गुन्हे) अविनाश अंबुरे, सहायक पोलीस आयुक्त (गुन्हे) अमोल मांडवे यांचे मार्गदर्शनाखाली अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंध शाखा नालासोपारा युनिटचे पोलीस निरीक्षक संतोष चौधरी व पोलीस हवालदार पवार, किणी, शेटये, शिंदे, महिला पोलीस हवालदार डोईफोडे, तिवले, जगदाळे, चालक पागी यांनी केली आहे.