तीन वर्षीय चिमुरडीवर बलात्कार करणाऱ्याची फाशीची शिक्षा कायम; उच्च न्यायालयाचा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Published: November 26, 2021 08:43 AM2021-11-26T08:43:53+5:302021-11-26T08:47:20+5:30

आरोपीचा अपराध भयंकर आहे आणि तो अत्यंत क्रूर आहे, असे निरीक्षण न्या. साधना जाधव व न्या. पृथ्वीराज चव्हाण यांनी नोंदविले.

Three year old girl rapist capital punishment upheld; High Court decision | तीन वर्षीय चिमुरडीवर बलात्कार करणाऱ्याची फाशीची शिक्षा कायम; उच्च न्यायालयाचा निर्णय

तीन वर्षीय चिमुरडीवर बलात्कार करणाऱ्याची फाशीची शिक्षा कायम; उच्च न्यायालयाचा निर्णय

googlenewsNext

मुंबई : मुलीची सुरक्षा ही समाजासाठी अत्यंत महत्त्वाची आहे, असे निरीक्षण नोंदवित उच्च न्यायालयाने २०१३ मध्ये तीन वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार करून तिची हत्या करणाऱ्या उत्तर प्रदेशाच्या एका आरोपीची फाशीची शिक्षा कायम केली. आरोपीला त्याच्या घृणास्पद कृत्याचा पश्चाताप नाही. त्यामुळे तो दयेस पात्र नाही, असे निरीक्षण न्यायालयाने आरोपीची फाशीची शिक्षा कायम केली.

आरोपीचा अपराध भयंकर आहे आणि तो अत्यंत क्रूर आहे, असे निरीक्षण न्या. साधना जाधव व न्या. पृथ्वीराज चव्हाण यांनी नोंदविले. ‘ दोन मुली आणि एका मुलाचे वडील असलेल्या पुरुषाची कामवासना पाळीव प्राण्याबरोबर आनंदाने, बागडत खेळणारी तीन वर्षीय मुलगी उत्तेजित करेल, हे अकल्पित आहे. आरोपी विकृत स्वभावाचा आहे, हे स्पष्ट आहे, ’ असे निरीक्षण न्यायालयाने नोंदविले.

उत्तर प्रदेशातील रामकिरत गौड हा नोकरीच्या शोधात ठाण्यात आला होता. त्यानंतर दोन आठवड्यांनी त्याने तीन वर्षाच्या मुलीवर बलात्कार केला. सप्टेंबर २०१३ मध्ये लहानगी तिच्या पाळीव कुत्र्याबरोबर घराबाहेर खेळत होती. गौड हिने तिला पकडले आणि तिच्यावर बलात्कार केला. आपला गुन्हा लपवण्यासाठी त्याने तिच्या डोक्यात दगड घालून हत्या केली व तिच्या मृतदेहाची विल्हेवाट एका गाळाने भरलेल्या तलावात लावली. चार दिवसांनी मृतदेह वर आला होता. 

काय म्हणाले न्यायालय
‘ दोषीचे राक्षसी कृत्य पाहता, असे दिसते की त्याने क्षणभर ही लहानगीच्या मौल्यवान आयुष्याचा विचार केला. वास्तविकता, तो स्वत: अशा दोन मुलींचा बाप आहे की ज्यांनी अजून आयुष्य पाहिले नाही. या गुन्ह्यात त्याची विकृती दिसून येते,’ असे निरीक्षण न्यायालयाने नोंदविले आहे. गौड या स्वत: अनुसूचित जातीचा आहे आणि त्याचे कुटुंब दारिद्र्यरेषेखाली येते. मात्र, त्याला दया दाखविण्यासाठी त्याची आर्थिक स्थिती गृहित धरू शकत नाही. कारण त्याला त्याने केलेल्या कृत्याचा पश्चाताप नाही, असेही न्यायालयाने म्हटले.
 

 

Web Title: Three year old girl rapist capital punishment upheld; High Court decision

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.