शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची युद्धात उडी, शेकडो क्षेपणास्त्रांद्वारे इस्राइलवर मोठा हल्ला, तेल अवीवमध्ये खळबळ
2
इराणच्या क्षेपणास्त्र हल्ल्यादरम्यानच भीषण दहशतवादी हल्ल्याने इस्राइल हादरले, ४ जणांचा मृत्यू, दोन दहशतवाद्यांचा खात्मा   
3
"एका पक्षाच्या बळावर सरकार येऊ शकत नाही", अमित शाहांच्या विधानावर अजित पवारांचं प्रत्युत्तर!
4
सनातन धर्माची रक्षा करणे ही आमची जबाबदारी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं विधान  
5
'पृथ्वीवरील सर्व खोटारडे मेले, तेव्हा राहुल गांधींचा जन्म झाला', शिवराज सिंह यांची बोचरी टीका
6
हॉटेलमध्ये प्रियकरासोबत शरीरसंबंध ठेवत असताना तरुणीचा मृत्यू, समोर आलं धक्कादायक कारण  
7
...म्हणून माजी सैनिकाने १४ दिवसांपासून डीप फ्रिजरमध्ये ठेवलाय मुलाचा मृतदेह, समोर आलं धक्कादायक कारण
8
IPL संघाच्या मालकाने खरेदी केला इंग्लडचा क्रिकेट क्लब; कोट्यवधींचा झाला व्यवहार
9
चमचम करता है नशीला बदन.... युजवेंद्र चहलची पत्नी धनश्रीचा 'स्पेशल' लूक, पाहा Photos
10
कोल्हापूरमधील मुरगूड येथे शिक्षकाने प्राध्यापिका पत्नीचा केला खून, समोर आलं धक्कादायक कारण
11
राहुल गांधींनी गोहाना जिलेबीची चव चाखली; काय आहे तिची खासियत?
12
GST संकलनात 6.5 टक्क्यांची वाढ; सप्टेंबर महिन्यात 1.73 लाख कोटींची वसुली
13
Mumbai Local: ठाकुर्ली-कल्याण मार्गावर तांत्रिक बिघाडामुळे मध्य रेल्वेची वाहतूक मंदावली  
14
US Election: कमला हॅरिस यांना धक्का; डोनाल्ड ट्रम्प यांनी निर्णायक ५ राज्यांमध्ये घेतली आघाडी
15
मोसादच्या मुख्यालयावर 'Fadi-4' क्षेपणास्त्र डागले, हिजबुल्लाहचा दावा 
16
'भाऊबीजेची ओवाळणी ॲडव्हान्स देणार'; लाडक्या बहीणींसाठी अजित पवारांची मोठी घोषणा
17
कळव्यात शालेय विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा; ४० जणांवर रुग्णालयात उपचार सुरु
18
शरद पवारांनी केला करेक्ट कार्यक्रम; २२ लाख कार्यकर्त्यांसह पक्ष गळाला, विधानसभेला कुणाचा गेम?
19
छत्रपती शिवरायांचा जो उदात्त हेतू होता, त्याच अपेक्षेने पंतप्रधान नरेंद्र मोदींची वाटचाल- मुख्यमंत्री मोहन यादव
20
रशियाचे लढाऊ विमान अमेरिकेत घुसले; थोडक्यात मोठा अनर्थ टळला, पाहा धक्कादायक व्हिडिओ

खुनाचा थरार! प्रॉपर्टीच्या वादातून दिवसाढवळ्या सपासप वार करून एकाची हत्या 

By ऑनलाइन लोकमत | Published: December 17, 2020 6:52 PM

Murder : कमाल चौकाजवळ थरार - दोन संशयित पोलिसांच्या ताब्यात

ठळक मुद्देगुड्डूने आईबहिणीवरून शिवीगाळ केल्याने संतापलेल्या पिंटू आणि विवेकने त्याच्यावर घातक शस्त्राचे सपासप घाव घालून त्याला रक्ताच्या थारोळ्यात लोळविले.

नागपूर - प्रॉपर्टीच्या वादातून दोघांनी गुड्डू तिवारी नामक व्यक्तीची शस्त्राचे घाव घालून निर्घृण हत्या केली. अत्यंत वर्दळीच्या कमाल चौकाजवळच्या शनिवार बाजारात गुरुवारी सायंकळी ही थरारक घटना घडली. या प्रकरणी पोलिसांनी पिंटू किल्लेदार आणि विवेक गोडबोले या दोन संशयीतांना ताब्यात घेतले.

 गुड्डू न्यायमंदीर परिसरात वाहन पार्किंगचे काम करायचा. तर, काही दिवसांपासून गुड्डू, पिंटू आणि विवेक हे तिघेही प्रॉपर्टी डिलींगचे काम करायचे. त्यांचा जुना क्राईम रेकॉर्डही आहे. एका प्रॉपर्टीच्या साैद्यावरून त्यांच्यात दोन दिवसांपासून धूसफूस सुरू होती. गुरुवारी सायंकाळी ४.३० च्या सुमारास हे तिघे शनिवार बाजारातील अवैध गुत्त्यावर एका झोपड्यात बसून होते. दारूच्या नशेत तेथे पुन्हा त्यांच्यात धुसफूस सुरू झाली. गुड्डूने आईबहिणीवरून शिवीगाळ केल्याने संतापलेल्या पिंटू आणि विवेकने त्याच्यावर घातक शस्त्राचे सपासप घाव घालून त्याला रक्ताच्या थारोळ्यात लोळविले. या प्रकारामुळे बाजारात प्रचंड थरार निर्माण झाला. अनेकांनी आपापले दुकान गुंडाळून तेथून पळ काढला. माहिती कळाल्यानंतर पाचपावलीचे ठाणेदार किशोर नगराळे आपल्यास सहकाऱ्यांसह घटनास्थळी पोहचले. परिमंडळ तीनचे उपायुक्त लोहित मतानी हेसुद्धा तेथे पोहचले. पोलिसांनी गुड्डूचा मृतदेह रुग्णालयात रवाना केला. आजुबाजुच्यांकडून मिळालेल्या माहितीवरून पोलिसांनी लगेच पिंटू आणि विवेकलाही ताब्यात घेतले.जुगारी, नशेडी आणि गुन्हेगारांची वर्दळज्या ठिकाणी गुड्डूची हत्या झाली तेथे सर्रास अवैध धंधे सुरू असतात. सट्टा, अड्डा, मटका, जुगार आणि अवैध दारू विक्रीही चालते. तेथेच अंडा, आमलेटही मिळते. त्यामुळे या ठिकाणी सकाळपासून रात्रीपर्यंत दारूडे, नशेडी, जुगारी आणि गुन्हेगारांची वर्दळ असते. पोलिसांना माहिती असूनही त्याकडे दुर्लक्ष केले जाते, असा आरोप आहे.  

टॅग्स :MurderखूनPoliceपोलिसArrestअटकnagpurनागपूर