NCB ने गेल्या आठवड्यात पोटातून अमली पदार्थांची तस्करी करणाऱ्या परदेशी नागरिकाला अटक करून १० कोटींचे कोकेन जप्त केले. त्यानंतर NCB ने आणखी एक मोठी कारवाई केली आहे. काल रात्री NCB ने ड्रग्ज तस्कारांवर कारवाई करत तब्बल १ कोटी रुपयांचे ड्रग्ज जप्त केले आहे. दरम्यान ड्रग्ज तस्कर गॅंगकडून NCB च्या अधिकाऱ्यांवर गोळीबार करण्यात आला आहे. या हल्ल्यात NCB चे पाच अधिकारी जखमी झाले आहेत. तसेच यातील एका अधिकाऱ्याची प्रकृती गंभीर असल्याची माहिती समोर आली आहे.
नवी मुंबई भागात ड्रग्ज तस्करीचे मोठे जाळे पसरले असल्याची गुप्त माहिती NCB ला मिळाली होती. या माहितीच्या आधारे NCB च्या अधिकाऱ्यांनी रात्री उशीरा संबंधित ठिकाणी छापेमारी करण्यात आली. मात्र, ड्रग पेडलरनं NCBच्या अधिकाऱ्यांवर हल्ला चढवला. या हल्ल्यात NCB चे ५ अधिकारी जखमी झाले आहेत. तसेच एका अधिकाऱ्याची प्रकृती गंभीर आहे. या कारवाईत NCB ने ड्रग्ज तस्कर गॅंगच्या म्होरक्याला अटक केली आहे. तसेच यावेळी अधिकाऱ्यांनी एक विदेशी बनावटीचे हत्यार जप्त केले आहे. ही माहिती NCB चे झोनल संचालक समिर वानखेडे यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे. ड्रग्ज तस्कर तिवरांच्या झाडांची मदत घेत फरार झाले आहेत. अन्य फरार आरोपींचा शोध सुरू आहे.