शहरं
Join us  
Trending Stories
1
Explainer : पश्चिम महाराष्ट्रात शरद पवारांच्या सभा गाजल्या; मात्र गर्दीचं रुपांतर मतांमध्ये होणार का?
2
“एक हैं तो सेफ हैं, राहुल गांधी फेक हैं, तेव्हा अदानी कोणाचे होते?”; विनोद तावडेंचा पलटवार
3
“२३ तारखेनंतर कोणावर दया नाही, फडणवीस-शिंदेंना पोलिसांत हेटपाटे मारावे लागतील”: संजय राऊत
4
शरद पवारांना मी आमदार केलं असं म्हणणार नाही, कारण त्यावेळी मी तिसरीत होतो: अजित पवार
5
महाराष्ट्रात मविआ सरकार आल्यास आरक्षणात मुस्लीम कोटा देण्यावर चर्चा; रेवंथ रेड्डींची गॅरंटी
6
मुख्यमंत्री नितीश कुमार एकुलता एक मुलगा निशांतला लाँच करण्याच्या तयारीत? चर्चांना उधाण
7
शर्वरी जोग नव्या मालिकेत झळकणार, अभिनेत्रीच्या खऱ्या आयुष्यातील 'मितवा' कोण माहितीये का?
8
जेठालालचंही मालिकेच्या निर्मात्याशी भांडण? थेट कॉलरच पकडली; नक्की प्रकरण काय वाचा
9
याला म्हणतात रिटर्न...! ₹2 चा शेअर ₹120 वर पोहोचला; 5 वर्षांत 5500% चा तुफान परतावा दिला; केलं मालामाल
10
RCB ची खतरनाक चाल! 'मुंबई'ला गतवैभव मिळवून देणाऱ्या चेहऱ्यावर खेळला मोठा डाव
11
फक्त या ४ गोष्टी वर्ज्य करून गायकानं घटवलं १३० किलो वजन, ट्रान्सफॉर्मेशन पाहून व्हाल हैराण
12
कोण आहेत अयातुल्लाह अली खामेनेई यांचे पुत्र मोजतबा? जे होऊ शकतात इराणचे पुढील सर्वोच्च नेते
13
दिल्लीमध्ये पुन्हा शेतकरी आंदोलन पेटणार, हजारो ट्रॅक्टर कूच करणार, उपोषणाचीही घोषणा
14
ना बाबा रामदेव, ना आचार्य बालकृष्ण? कोण आहे ₹67535 कोटींच्या पतंजलीचा खरा मालक? योगगुरूंनीच सांगितलं...
15
बुलढाण्यात शिवसेना उमेदवाराला पाठिंबा दिल्याचं पत्र खोटं; राष्ट्रवादी काँग्रेसनं दिलं स्पष्टीकरण
16
यशाच्या शिखरावर असताना लग्न का केलं? माधुरी दीक्षित म्हणाली, "मी माझं स्वप्न..."
17
रूकेगा नहीं... इस्रायलचे लेबनानवर हल्ले सुरूच, हिज्बुल्लाच्या मुख्य प्रवक्त्याचा केला खात्मा
18
175 किमीची रेंज देणारी 'ही' इलेक्ट्रिक बाईक, किंमत 90 हजारांपेक्षा कमी
19
Numerology: ‘या’ ५ मूलांकांवर दत्तकृपा; गुरुपुष्यामृत योगावर अपार लाभ, लक्ष्मी शुभच करेल!
20
Vastu Tips: आजारमुक्त वास्तु ठेवण्यासाठी फॉलो करा 'या' सोप्या वास्तुटिप्स!

अरेरावी! विनातिकीट रेल्वे प्रवास करणाऱ्यांनी टीसींना केली मारहाण  

By ऑनलाइन लोकमत | Published: December 25, 2019 2:57 PM

याप्रकरणी रेल्वे पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

ठळक मुद्दे टीसींना मारहाण केल्यामुळे प्रवाशांनी विनातिकीट रेल्वे प्रवास करणाऱ्या प्रवाशांवर कडक कारवाई करण्याची मागणी केली. वडाळा रेल्वे पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून दोन्ही आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे.

मुंबई - एकाच दिवशी रेल्वेच्या २ टीसींना मारहाण केल्याची धक्कादायक घटना किंग्ज सर्कल आणि वांद्रे स्थानकांवर घडली आहे. मंगळवारी ही घटना घडली असून दोन्ही घटनांमध्ये विनातिकीट प्रवास करणाऱ्यांच्या अरेरावीमुळे टीसींना मारहाण करण्यात आली आहे. टीसींना मारहाण केल्यामुळे प्रवाशांनी विनातिकीट रेल्वे प्रवास करणाऱ्या प्रवाशांवर कडक कारवाई करण्याची मागणी केली. याप्रकरणी रेल्वे पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.मंगळवारी हार्बर मार्गावरील गोरेगाव स्थानकातून तौफीक कुरेशी (२९)आणि अन्सारी रेहान अन्वर इकबाल अहमद (२७) हे  प्रवास करत होते. संध्याकाळी ४.३० वाजताच्या सुमारास हे दोन्हा प्रवासी किंग्ज सर्कल स्थानकात उतरले. स्थानकातून जात असताना टीसी हरेराम शर्मा यांनी या दोन प्रवाशांकडे तिकिटांची विचारणा केली. मात्र, त्यांनी उडवाउडवीची कारणं दिली. शर्मा यांनी दंड भरण्यास सांगितलं. मात्र, त्यांनी शर्मा यांना रेल्वे रुळांवर फेकले. जखमी झालेल्या शर्मा यांना भायखळा येथील हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. त्यांच्या उजव्या मनगटाला फ्रॅक्चर झाले आहे.या घटनेमध्ये शर्मा यांच्या हाताला आणि पाठीला मार लागला आहे. वडाळा रेल्वे पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून दोन्ही आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे.वांद्रे स्थानकात वरिष्ठ टीसी असलेल्या विवेककुमार राय यांना सकाळी १०.३० वाजताच्या सुमारास एक प्रवासी विनातिकीट प्रवास करून वांद्रे स्थानकातील प्लॅटफॉर्म क्रमांक १ वर उतरला. तिकीट नसतानाही त्या प्रवाशाने राय यांच्याशी हुज्जत घालण्यास सुरुवात केली. या प्रवाशाने देखील टीसीला धक्का दिला.जोरदार धक्काने राय रेल्वे रुळांवर पडले आणि जखमी झाले. राय यांना उपचारासाठी जगजीवन राम हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले.या प्रकरणी अज्ञाताविरोधात वांद्रे पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवला असून, आरोपीचा तपास घेतला जात आहे.

टॅग्स :railwayरेल्वेMumbaiमुंबईticketतिकिटArrestअटक