दिल्लीचं तिहार जेल सध्या चर्चेत आहे. असं सांगितलं जात आहे की, पंजाबी गायक सिद्धू मूसेवालाच्या हत्येचं प्लानिंग दिल्लीच्या तिहार तुरूंगाच करण्यात आलं. या हत्येप्रकरणात तिहार तुरूंगात कैद असलेल्या लॉरेन्स बिश्नोईचं नाव समोर येत आहे. दिल्लीच्या तिहार तुरूंगात अनेक मोठ्या गुन्हेगारांना ठेवलं जातं. तिहारमधील ३ नंबरच्या तुरूंगाची जबाबदारी असिस्टंट सुप्रिटेंडेंट ऑफ पोलीस दीपक शर्मा (Deepak Sharma) यांच्याकडे आहे.
इथे येण्याआधी जेलर दीपक शर्मा (Tihar Jail Jailer ) दिल्लीच्या मंडोली तुरूंगा डेप्युटी सुप्रिटेंडेंट होते. निर्भया कांडाच्या दोषींना फाशी देताना त्यांची नियुक्ती इथे गेली गेली होती. सुप्रिटेंडेंट दीपक शर्मा एक प्रोफेशनल बॉडी बिल्डर आहेत आणि अनेक बॉडी बिल्डींग स्पर्धा त्यांनी जिंकल्या आहेत.
एका मुलाखतीत दीपक शर्माने सांगितलं होतं की, मी २००९ मध्ये पोलिसात भरती झालो होतो. त्यानंतर म सलमान खानचा दबंग सिनेमा पाहिला आणि त्याच्यासारखी पर्सनॅलिटी बनवण्यासाठी मी बॉडी बनवण्याचा निर्णय घेतला होता. दीपक शर्मा यांच्या फिजिकबाबत सांगायचं तर भले भले लोक त्यांच्या फिटनेससमोर फेल आहेत. त्यांची जवळपास ४८ इंचाची तर बायसेप्स १९ इंचाचे आहेत. बिझी शेड्यूलनंतरही ते वर्कआउटसाठी वेळ काढतात.
दीपक शर्मा यांनी प्रोफेशनल बॉडी बिल्डर म्हणून २०१४ मध्ये पहिल्यांदा स्पर्धेत भाग घेतला होता. यानंतर त्यांनी अनेक किताब जिंकले आहेत. मिस्टर यूपी, आयर्न मॅन ऑफ दिल्ली, मिस्टर हरयाणा, मिस्टर दिल्ली, स्टील मॅन इंडिया सारखे टायटल दीपक शर्मा यांच्या नावी आहेत.
दीपक शर्मा यांनी एका मुलाखतीत सांगितलं होतं की, अनेक कैदी त्यांच्याकडून फिटनेस टिप्सही घेतात. तुरूंगात अनेक अॅक्टिविटीही होतात. ज्यात कैदी मोठ्या संख्येने सहभागी होतात. काही वेळा काही कैद्यांना समजावून सांगणं फार अवघड असतं, पण आम्ही त्यांच्यासाठी वेगवेगळे उपाय करतो.
मुलाखती दरम्यान दीपक यांनी सांगितलं होतं की, ते २४ तासातील कमीत कमी ३ ते ४ तास वर्कआउट करतात. प्रोफेशनल बॉडीबिल्डर नात्याने त्यांना डिपार्टमेंटकडून काही तासांच्या ड्युटीतून सूटही मिळते. पण ड्युटीसोबत फिटनेसवर लक्ष देणं फार अवघड होतं.