दिल्लीतील तिहार तुरुंगातील जेलर दीपक शर्मा यांची ५० लाखांची फसवणूक केल्याची घटना समोर आली आहे. जेलर दीपक शर्मा यांनी आरोपींविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. आरोग्य उत्पादनाच्या व्यवसायाच्या नावाखाली त्यांची फसवणूक झाल्याचे समोर आले. एका महिलेने तिच्या पतीसह फसवणूक केली आहे.
प्रेशर कुकरपासून तयार झाली हत्येची रेसिपी; गर्लफ्रेंडवर संशय होताच केला THE END
दीपक शर्मा दिल्लीतील पश्चिम विनोद नगर येथे राहतात. त्यांनी पूर्व दिल्लीतील मधु विहार पोलीस ठाण्यामध्ये आरोपीविरुद्ध तक्रार दाखल केली आहे. मात्र, आरोपी पती-पत्नी घटनास्थळावरून फरार झाले आहेत. शर्मा यांनी दिलेली माहिती अशी की, त्यांनी डिस्कव्हरी चॅनलवरील 'अल्टीमेट वॉरियर' या रिअॅलिटी शोमध्येही भाग घेतला होता. येथेच त्यांची भेट रौनक गुलिया या आणखी एका स्पर्धकाशी झाली.
दीपक शर्मा यांच्या म्हणण्यानुसार, रौनक गुलियाने सांगितले की, त्यांचे पती अंकित गुलिया व्यवसाय करतात आणि ते एका प्रसिद्ध आरोग्य उत्पादनाचे उद्योजक आहेत. आरोग्य उत्पादन व्यवसाय खूप फायदेशीर आहे. म्हणूनच त्यांनी या व्यवसायात यावे. या दोघांनी आपल्या आरोग्य पूरक उत्पादनात गुंतवणूक करण्याच्या आणि व्यवसायात भरघोस नफा कमावण्याच्या बहाण्याने ब्रँड अॅम्बेसेडर बनवण्याच्या नावाखाली ही ५० लाखांची रक्कम घेतल्याचे दीपक शर्मा यांनी पोलिसांना दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे.
दीपक शर्मा यांनी दिलेल्या तक्रारीवरुन पती-पत्नी दोघांनाही पोलिसांकडून अटक केली असून त्यांच्याकडून संपूर्ण रक्कम परत मिळवून देण्याची मागणी केली आहे. शर्मा यांनी दिलेल्या माहितीनुसार, सुरुवातीला त्यांना कल्पना नव्हती की रौनक आणि तिच्या पतीचा काही पसवणुकीचा हेतू आहे. पैसे परत न केल्याने त्यांची फसवणूक झाल्याचे जाणवले. गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस या संपूर्ण प्रकरणाच्या तपास करत आहेत. आरोपी पती-पत्नी दोघेही फरार आहेत. पोलीस त्यांना लवकरच शोधून काढतील.