राजकोट - पत्नीच्या छळाला कथितरित्या बळी पडलेल्या पतीला बराच काळ तुरुंगात जायचे होते, म्हणून त्याने पोलिस स्टेशनला आग लावली, जेणेकरून पत्नीकडून सुटका होईल आणि तुरुंगात जाण्यास मिळेल. ही काल्पनिक कथा नसून गुजरातमधील राजकोट येथे घडलेली एक सत्य घटना आहे. सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान केल्याप्रकरणी पोलिसांनी त्या व्यक्तीला अटक केली आहे. या व्यक्तीने रविवारी राजकोट शहरातील जामनगर रोडवरील बजरंग वाडी पोलीस चौकीला आग लावली आणि आग लागल्यानंतरही पोलीस स्टेशनच्या बाहेर उभा राहिला. न्यूज 18 गुजरातीशी संवाद साधताना गांधीग्राम पोलीस स्टेशनचे निरीक्षक खुमानसिंग वाला म्हणाले, “बजरंग वाडीतील पोलीस चौकीला आग लावणाऱ्या व्यक्तीचे नाव देवजी उर्फ देव चावडा आहे. अटकेनंतर देव चावडा यांनी सांगितले की, आर्थिक चणचण आणि घरगुती समस्यांमुळे त्यांनी पोलीस चौकीला आग लावली.संपूर्ण प्रकरणात गांधीग्राम पोलिसांनी सरकारी मालमत्तेचे नुकसान केल्याप्रकरणी आयपीसीच्या कलम 436 अंतर्गत देवजीला अटक केली आहे. पोलीस तपासात आरोपी देवजीने सांगितले की, तो आपल्या पत्नीला खूप कंटाळला होता आणि त्याला बराच काळ तुरुंगात जायचे होते, म्हणून त्याने पोलीस चौकीला आग लावली. आयपीसी कलम 436 नुसार त्या व्यक्तीला दहा वर्षे कारावास किंवा दंडाची तरतूद आहे. अशा परिस्थितीत देवजी किती काळ तुरुंगात राहतात हे पाहणे मनोरंजक ठरणार आहे.
पत्नीच्या छळाला कंटाळून पतीने पोलीस ठाणंच पेटवून दिलं; म्हणे जायचं होतं तुरुंगात
By ऑनलाइन लोकमत | Published: August 30, 2021 4:48 PM
Fed up with my wifes harassment husband ablazed police station : या व्यक्तीने रविवारी राजकोट शहरातील जामनगर रोडवरील बजरंग वाडी पोलीस चौकीला आग लावली आणि आग लागल्यानंतरही पोलीस स्टेशनच्या बाहेर उभा राहिला.
ठळक मुद्दे संपूर्ण प्रकरणात गांधीग्राम पोलिसांनी सरकारी मालमत्तेचे नुकसान केल्याप्रकरणी आयपीसीच्या कलम 436 अंतर्गत देवजीला अटक केली आहे.