कल्याण - ठाकूर्ली येथील मराठी शाळेजवळ असलेल्या पतपेढीच्या कार्यालयात पतपेढीच्या व्यवस्थापकाने पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज घडली आहे. आत्महत्या करणा:या पतपेढी व्यवस्थापकाचे नाव योगशे आरोटे (४४) असे आहे. आत्महत्येपूर्वी योगेश यांनी चिठ्ठी लिहीली आहे. त्यात जीवनाला कंटाळून आत्महत्या करीत असल्याचे म्हटले आहे.
मराठी शाळेच्या बाजूला सहकारमित्र मधूबन पतपेढी आहे. या पतपेढीत गेल्या अनेक वर्षापासून योगेश आरोटे हे व्यवस्थापक पदी काम करीत होते. पतपेढी कार्यालयाच्या चाव्या तीन जणांकडे आहेत. त्यापैकी एक चावी योगेश यांच्याकडे होती. नेहमी प्रमाणो योगेश हे आज पतपेढीत आले. त्यांनी पतपेढीचे गेट उघडून आत प्रवेश केला. काही वेळेनंतर पतपेढीतील कर्मचारी आला. त्याने पाहिले की, पतपेढीच्या एका दालनात पंख्याला योगेश हे गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आले. त्यांनी पोलिस व पतपेढीच्या अध्यक्षाना पाचारण केले. रामनगर पोलिस ठाण्याचे पोलिस अधिकारी मनोहर घाडगे यांनी पोलिस पथकासह पतपेढीत धाव घेतली. योगेश यांचा मृतदेह खाली उतरवून त्यांच्या कपडय़ाची झडती घेतली.
त्यावेळी योगेश यांच्या शर्टाच्या खिशात एक चिठ्ठी आढळून आली. त्यात योगेश यांनी लिहिले होते की, मी जीवनाला कंटाळून आत्महत्या करीत आहे. माङयावर इथेच अंत्यसंस्कार असा या दोन वेळी लिहिल्या होत्या. पोलिसांनीही चिठ्ठी हस्तगत केली आहे. पोलिसांनी योगेशचा मृतदेह शवविच्छेदनासाठी सरकारी रुग्णालयात पाठविला आहे. या घटनेचा पोलिस तपास सुरु आहे. पतपेढीचे अध्यक्ष सुदाम गायकर यांनी सांगितले की, पतपेढीच्या स्थापनेपासून योगेश पतपेढीत कार्यरत होते. एक अत्यंत चांगली व्यक्ति असा त्यांचा नावलौकीक होता. त्यांनी आत्महत्या केल्याने आम्हाला मोठा धक्का बसला आहे.