तामिळनाडूमध्ये एका व्यक्तीने फारच हुशारीने आपल्या पत्नीची हत्या केली. पत्नीची हत्या करण्यासाठी आधी त्याने काही लोकांची गॅंग तयार केली आणि नंतर दुचाकीवरून जात असलेल्या पत्नीला एक मिनी ट्रक धडक दिली. मात्र, तपासात आरोपी पतीची पोलखोलल झाली आणि पोलिसांनी ट्रक ड्रायव्हरसहीत पूर्ण गॅंगचा भांडाफोड केला. मृत महिलेचा पती अमेरिकेत एका आयटी कंपनीत नोकरी करतो. तिथे त्याने हा सगळा प्लॅन तयार केला होता. आता पोलीस त्याला भारतात आणण्याची तयारी करत आहे.
या खळबळजनक घटनेत २८ वर्षीय महिलेची तिच्या पतीने गॅंगच्या माध्यमातून हत्या केली. २१ मे रोजी दुचाकीने कामाहून घरी जाताना तिरूवरूरच्या किदारानकोंडम शहरात राहणाऱ्या जयबरथीची हत्या करण्यात आली. जयबरथीचं लग्न पाच वर्षाआधी विष्णुप्रकाश नावाच्या पुरूषासोबत झालं होतं. तो अमेरिकेत आयटी इंडस्ट्रीत नोकरी करत होता. सुरूवातीला जयबरथी विष्णुप्रकाशसोबत अमेरिकेत राहत होती. (हे पण वाचा : पतीकडून पत्नीची निर्दयीपणे हत्या, मेहुणीला फोन करून म्हणाला - 'तुझ्या बहिणीला छतावरून खाली फेकलं')
काय होतं कारण?
मात्र, नुकतीच जयबरथी अमेरिकेतून भारतात परतली होती. इथे येताच तिने घटस्फोटासाठी अर्ज दिला. असे सांगितले जात आहे की, विष्णुप्रकाश या गोष्टीने चिंतेत होता की, घटस्फोटानंतर त्याला पत्नीला पोटगी द्यावी लागले. म्हणून त्याने पत्नीची हत्या करण्याचा प्लॅंन केला.
सुरूवातीला महिलेची हत्या एक अपघात वाटत होता. पण तिच्या परिवाराने हत्येचा संशय व्यक्त केला होता. मृत महिलेच्या परिवाराला काही असे पुरावे मिळाले होते ज्याने हा मृत्यू संशयास्पद वाटत होता. त्यामुळे ते पोलिसात गेले.
त्यांनी सांगितले की, एक मिनी ट्रक विरूद्ध दिशेने येत होता. त्याने कामाहून घरी परतत असलेल्या जयबरथीला टक्कर मारली. महिलेला टक्कर मारून आरोपी घटनास्थळावरून फरार झाले. जयबरथीच्या शरीरातून रक्त वाहत होतं. काही लोक तिला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले. पण दुर्दैवाने तिला वाचवता येऊ शकले नाही. त्यानंतर परिवाराने पोलिसात यासंबंधी तक्रार दिली. (हे पण वाचा : किरकोळ भांडणात पतीने केला पत्नीचा गळा दाबून खून)
कशी झाली हत्या?
पोलिसांनी सांगितले की, २०१५ मध्ये जयबरथीने पतीसोबत वाद झाल्याने घटस्फोटाचा निर्णय घेतला. विष्णुप्रकाशने कथितपणे जयबरथी आणि तिच्या परिवाराला धमकी दिली होती. सोबतच त्याला पोटगी द्यावी लागणार याचीही भीती होती. पोलिसांना सीसीटीव्ही फुटेज आणि साक्षीदारांच्या मदतीने असं आढळलं की, या ट्रकने याआधीही जयबरथीचा पाठलाग केला होता. ट्रक सेंथीकुमार व्यक्तीच्या नावावर होता. त्याची चौकशी केली तर समजलं की, त्याने ट्रक विकला.
पुढे तपासात पोलिसांना आढळलं की, त्याचा मित्र प्रसन्ना आणि राजा नावाची व्यक्ती जयबरथीच्या हत्येत सहभागी होते. पोलिसांना आढळलं की, या लोकांना सेंथीकुमार नावाच्या एका दुसऱ्या व्यक्तीने हत्येच्या प्लॅनिंगमध्ये सहभागी करून घेतलं होतं. तो विष्णुप्रकाशचा नातेवाईक होता.
पोलिसांना असंही आढळून आलं की, ट्रकचा मालक सेंशिलकुमारने ट्रक विकल्याचं नाटक विष्णुपप्रकाशचा नातेवाईक सेंथिल कुमारच्या योजनेनुसारच केलं होतं. ज्यानंतर पोलिसांनी या हत्येशी संबंधित सर्वांना अटक केली. सोबतच पोलिसांनी अमेरिकेत भारतीय अॅम्बसीला सूचना दिली आणि विष्णुप्रकाशला लवकरच भारतात आणलं जाण्याची अपेक्षा केली जात आहे.