नवी दिल्ली - पश्चिम बंगालच्या हुगळी जिल्ह्यात माणुसकीला काळीमा फासणारी एक घटना घडली आहे. जिल्ह्यातील तृणमूल काँग्रेसच्या एका स्थानिक नेत्याच्या मुलावर गंभीर आरोप करण्यात आले आहेत. मुलाने पोलीस अधिकाऱ्याच्या मुलीचे फोटो मॉर्फ करून पॉर्न वेबसाईटवर अपलोड केले आहेत. इतकंच नाही तर त्याने मुलीचा फोन नंबरही या साईटवर अपलोड केला होता. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ही मुलगी आणि आरोपी यांची आधीपासूनच ओळख होती. मुलीच्या कुटुंबीयांनी जून महिन्यातच बिधाननगर पोलिसांत तक्रार दाखल केली होती. मात्र पोलिसांनी शनिवारी आयटी एक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करून घेतला.
पोलीस अधिकारी असलेल्या मुलीच्या वडिलांनी एक पोलीस अधिकारी असून मला न्याय मिळाला नाही तर सर्वसामान्य जनतेचं काय होईल असं म्हटलं आहे. मुलीने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, आरोपीच्या या कृत्यानंतर मला केवळ इतर राज्यांतूनच नाही तर बाहेरच्या देशांमधूनही फोन येऊ लागले. या घटनेनंतर सत्ताधारी तृणमूल काँग्रेस आणि भाजपामध्ये राजकीय वाद सुरू झाला आहे. एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. तसेच पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
पश्चिम बंगालचेभाजपा प्रदेशाध्यक्ष दिलीप घोष यांनी पोलीस निष्क्रीय झाले आहेत. काही चांगल्या अधिकाऱ्यांना टीएमसीने दूर केलं आहे. कदाचित त्यांनी ते काम केलं नसावं, जे निवडणूकांच्या काळात तृणमूलने त्यांना करायला सांगितलं. याचीच किंमत त्यांना चुकवावी लागली. पोलीस तरी काय करतील? असं म्हटलं आहे. तर टीएमसी मंत्री सुजीत बोस यांनी सायबर गुन्हे केवळ पश्चिम बंगालमध्येच होत नाहीत. हे जगभरात होतात. पश्चिम बंगाल पोलीस याप्रकरणी तात्काळ कारवाई करतात. तसंच याच पक्षाचा काहीही हस्तक्षेप नसून सर्व आरोप चुकीचे असल्याचा दावा त्यांनी केला आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
राजस्थानच्या अलवरमध्ये माणुसकीला काळीमा फासणारी एक घटना घडली आहे. एका 19 वर्षीय मुलीचं अपहरण करून तिच्यावर सात लोकांनी तीन वेगवेगळ्या ठिकाणी सामूहिक बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. भयंकर बाब म्हणजे नराधमांनी मुलीला बेशुद्ध अवस्थेत रस्त्याच्या कडेला फेकून दिलं आणि ते फरार झाले आहेत. या प्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली असून पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत. घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी पीडितेची वैद्यकीय तपासणी केल्यानंतर जबाब नोंदविला आहे.