तामिळनाडू इथं मागील वर्षी सप्टेंबर महिन्यात चेंगलपेट परिसरात लागलेल्या आगीत एका व्यक्तीचा मृत्यू झाला. पोलिसांनी या घटनेची अपघाती नोंद करून जवळपास फाईल बंदच केली होती. परंतु काही दिवसांनी पोलिसांना अशी माहिती मिळाली ज्यामुळे पोलिसांनी नव्यानं याचा तपास सुरू केला आणि पोलिसांच्या तपासात जे काही समोर आले त्याने पोलीस हैराण झाले. ज्या व्यक्तीचा आगीत मृत्यू झाल्याचं नोंद केले होते. तो चक्क जिवंत असल्याचं तपासात समोर आले. स्वत:च्या मृत्यूचा बनाव रचण्यासाठी त्याने मित्राची हत्या केली होती.
काय आहे प्रकरण?सुरेश आर नावाचा एका युवक चेन्नईमध्ये राहून जिममध्ये फिजिकल ट्रेनरचे काम करायचा. मागील काही दिवसांपूर्वी तो चेन्नईतून परतून चेंगलपेटच्या अल्लानूर इथं राहायला आला. १६ सप्टेंबरला सुरेश ज्या घरात राहायचा तिथे आग लागली. या आगीत एका व्यक्तीचा मृत्यू झाला. ज्याला तो सुरेश असल्याचं त्याच्या आईने सांगितले. परंतु मृत युवक सुरेशच आहे हे मानायला पोलीस तयार नव्हती. मग डिसेंबरमध्ये पोलिसांना सुरेश जिवंत असल्याची माहिती मिळाली. सध्या पोलीस या घटनेचा तपास करत आहे.
सुरेशचा मृत्यू झाल्यापासून मित्र बेपत्ता तपासादरम्यान पोलिसांना कळले की, सुरेशचा एक मित्र दिल्ली बाबू (वय ३९ वर्ष) सुरेशच्या मृत्यूपासून बेपत्ता होता. बाबूच्या कुटुंबीयांनी पोलिसात बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली होती. यावरून पोलिसांना बाबूचा मोठा भाऊ पलानी याच्याकडून माहिती घेतली असता दिल्ली बाबू अनेकदा सुरेशच्या घरी जात असे आणि दोघेही मित्र होते असं कळाले. याबाबत पोलिसांना संशय आल्याने त्यांनी सुरेश आणि दिल्लीच्या मित्राच्या चौकशी केली असता सुरेशच्या घराला आग लागली तेव्हा दिल्ली बाबूही त्याआधी त्याच ठिकाणी दिसला होता.
'असा' केला पोलिसांनी खुलासा दरम्यान, सुरेशला कोणीतरी पाहिल्याची माहिती पोलिसांना मिळाली. तपासादरम्यान पोलिसांना हरिकृष्ण हा सुरेशचा जवळचा मित्र असल्याची माहिती मिळाली. यावर पोलीस वेल्लोर येथील हरिकृष्णाच्या घरी पोहोचले, तिथे पोलिसांना हरिकृष्णाच्या वडिलांचा फोन नंबर मिळाला. या फोन नंबरच्या मदतीने पोलीस वेल्लोरच्या अरक्कोनम भागात हरिकृष्णाच्या लपलेल्या ठिकाणी पोहोचले. पोलीस हरिकृष्णाच्या खोलीत पोहोचले तेव्हा हरिकृष्णासोबत सुरेशही तेथे आढळून आला.
यानंतर पोलिसांनी सुरेशची चौकशी केली असता सुरेशने स्वतःचा एक कोटी रुपयांचा विमा काढल्याचे समोर आले. ही विम्याची रक्कम मिळवण्यासाठी त्याने दिल्ली बाबूला मारून त्याच्या मृत्यूचा बनाव रचला जेणेकरून विमा म्हणून एक कोटी रुपये मिळावेत. या कामात सुरेशला हरिकृष्ण आणि गावातील आणखी एक मित्र कीर्ती रंजन यांचीही साथ मिळाली. सध्या पोलिसांनी तिघांनाही अटक करून तुरुंगात पाठवले आहे.