सुशांत राजपूतची प्रेयसी रिया चक्रवर्ती हिला ड्रग्ज प्रकरणात मंगळवारी अटक करण्यात आली होती. यानंतर कोर्टाने त्याला 14 दिवस न्यायालयीन कोठडी सुनावली. कोर्टाच्या निर्णयानंतर रियाला पहिली रात्र एनसीबी लॉकअपमध्ये काढावी लागली. रियाने जामीन मागितला असला तरी त्यावेळी कोर्टाने नकार दिला. त्यानंतर रियाची भायखळा जेलमध्ये रवानगी करण्यात आली आहे. रियाने पुन्हा सत्र न्यायालयात जामिनासाठी अर्ज दाखल केला आहे. त्यावर आज सत्र न्यायालयाच्या विशेष न्यायालयात आज सुनावणी पार पडली. मात्र, न्यायालय उद्या रिया आणि शोविकच्या जामिनावर आदेश देणार आहे. रियासह शोविकच्या जामीन अर्जावर न्यायालय उद्या निर्णय देणार आहे. भायखळा जेलमध्ये ज्या सेलमध्ये रियाला ठेवलं गेलं आहे ती सर्वसाधारण बॅरेकजवळ आहे. शीना बोरा हत्या प्रकरणातील आरोपी इंद्राणी मुखर्जीही या जेलमध्ये बंद आहे. रियाचा सेल इंद्राणी मुखर्जीजवळ आहे. रिया चक्रवर्तीच्या अटकेआधी एनसीबीने तिचा भाऊ शोविक याच्यावर कडक कारवाई करत अटक केली होती. शोविकबरोबरच इतर अनेक ड्रग पेडलर्सनाही एनसीबीने अटक केली. रियाने शोविकबरोबरच्या ड्रग चॅटचा खुलासा केला होता. एनसीबीने रियावर केलेल्या चौकशीत ड्रग्स खरेदी केल्याची कबुली दिली. पण ड्रग्ज घेण्याबाबत नकार दिला. रिया असेही म्हणाली की ती सुशांतसाठी ड्रग्जची व्यवस्था करीत असे. तसेच शोविकने देखील आपल्या जबाबत मी ड्रग्जची सुशांतला व्यवस्था करत असून त्यासाठी बहीण रिया पैसे देत असल्याचं कबूल केले आहे.रिया चक्रवर्तीचा भाऊ शोविक चक्रवर्ती याला कोर्टाकडून 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी मिळाली असून इतरांनाही न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. बुधवार हा रियाचा भाऊ शोविक चक्रवर्तीसाठीसुद्धा खूप महत्वाचा होता. बुधवारी एनसीबीचा रिमांड संपला, अशा परिस्थितीत शोविकला कोर्टाकडून १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.एनसीबीच्या या मोठ्या कारवाईनंतर बॉलिवूडचीही झोप उडाली आहे. जेव्हापासून अशी बातमी समोर आली आहे की एनसीबीला ड्रग पार्टीमध्ये भाग घेणार्या 25 सेलिब्रिटींची यादी देण्यात आली आहे तेव्हापासून अनेक कलाकारांची झोप उडाली आहे. एनसीबीने स्पष्ट केले आहे की, ड्रग्ज सिंडिकेट उघडकीस येईल. शोविक आणि रियाविरूद्धची कारवाई या दिशेने पहिले पाऊल मानले जात आहे.
अन्य महत्वाच्या बातम्या...
सर्वात मोठी बातमी! रियाला अटक, मेडिकलसाठी NCB ची टीम घेऊन जाणार
‘रिया ही तर बळीचा बकरा, तिनं सुशांत प्रकरणातील मास्टरमाईंडची नावं उघड करावीत’
लज्जास्पद! फेस मास्क घालून केले बेशुद्ध अन् केला अल्पवयीन मुलीवर बलात्कार
एल्गार प्रकरणी ज्योती जगतापसह तिघांना ४ दिवसांची NIA कोठडी
मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या फार्महाऊसची रेकी करणाऱ्या तिघांना ATSने केली अटक
रिया - शोविकला बेल की जेल, थोड्याच वेळात सेशन्स कोर्ट निर्णय देणार?