शहरं
Join us  
Trending Stories
1
निकालानंतर सत्तेची समीकरणं बदलणार?; ; अजित पवार गटाच्या आणखी एका नेत्याचा दावा
2
निर्लज्जपणाचा कळस! ऋतुराज पंचांसह खेळाडूंवर संतापला; 'महाराष्ट्रा'साठी आवाज उठवला
3
Maharashtra: "अजित पवार जोपर्यंत भाजपसोबत, तोपर्यंत एकत्र येणे..."; सुप्रिया सुळेंचं मोठं विधान
4
“जो शब्द दिला तो पाळतात, अजित पवार मर्द माणूस”; नवाब मलिकांनी केले तोंडभरून कौतुक
5
Vidhan Sabha 2024: उमरेडमध्ये 'पारवें'चे डबल इंजिन धावणार की, काँग्रेसचे 'दलित कार्ड' चालणार?
6
भारताविरूद्धच्या मालिकेआधी ऑस्ट्रेलियाला मोठा धक्का; दुखापतग्रस्त खेळाडूने मैदान सोडले!
7
शेअर बाजारात २ दिवसांत कमावलं, ते काही तासांत गमावलं! या सेक्टरमध्ये सर्वाधिक घसरण
8
काँग्रेसचा प्रचार धडाका! राहुल गांधी, प्रियंका गांधी, खरगेंसह प्रमुख नेते महाराष्ट्रात
9
"जिवंत राहिले तर...!"; सुजलेल्या चेहऱ्यासह फोटो शेअर करत साध्वी प्रज्ञा सिंह यांचा काँग्रेसवर आरोप
10
सौरव गांगुलीचा सल्ला अन् भारताच्या स्टार खेळाडूनं 'निवृत्ती'चा निर्णय बदलला, म्हणाला...
11
बाबा सिद्दिकी यांच्या हत्येबाबत मोठी अपडेट, आरोपींनी आधीच शस्त्रे लपवली होती, पुण्यातून आणखी दोन जणांना अटक
12
कोण आहेत भारतीय वंशाचे कश्यप 'काश' पटेल? डोनाल्ड ट्रम्प यांचे विश्वासू, जे बनू शकतात CIA चीफ!
13
Gold Rates Today : सोनं-चांदी खरेदी करणाऱ्यांसाठी 'गुड न्यूज', जोरदार आपटलाय भाव! पटापट चेक करा 14 ते 24 कॅरेट सोन्याचा लेटेस्ट रेट
14
३५४ मतदार... झोपडीतील मतदान केंद्र...; २० किमी पायपीट करून निरीक्षकांनी केली पाहणी
15
आज दहशतवादी गांधी कुटुंबाची मदत मागताहेत; 'त्या' पत्रावरुन स्मृती इराणींचा हल्लाबोल
16
Shah Rukh Khan : "माझा फोन २ नोव्हेंबरला चोरीला गेला"; शाहरुखला धमकावल्याचा आरोप असलेल्या फैजानचा दावा
17
सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी विचारला घटनात्मक प्रश्न; AI Lawyer दिले ‘असे’ उत्तर, Video व्हायरल
18
"मी एक हिंदू आहे त्यामुळे..."; एकता कपूर असं काय म्हणाली की नेटकऱ्यांनी केला कौतुकाचा वर्षाव
19
अली फजल अन् रिचा चड्डाच्या लेकीचं नाव आलं समोर, अर्थही आहे खूपच खास
20
Truecaller कंपनीवर आयकर विभागाचा छापा, कार्यालयाची घेतली झाडाझडती

पाच वर्षाच्या चिमुरडीवर अत्याचार; संशयिताला अटक

By ऑनलाइन लोकमत | Published: October 18, 2018 1:53 PM

जळगाव - शहरातील कोल्हे हिल्स परिसरातील जाणता राजा स्कूलजवळील झोपडीत राहणाऱ्या मजुराच्या 5 वर्षांच्या मुलीवर अज्ञाताने अत्याचार केल्याची घटना गुरुवारी ...

जळगाव - शहरातील कोल्हे हिल्स परिसरातील जाणता राजा स्कूलजवळील झोपडीत राहणाऱ्या मजुराच्या 5 वर्षांच्या मुलीवर अज्ञाताने अत्याचार केल्याची घटना गुरुवारी पहाटे समोर आली आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून पोलीस, तातडीने घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर तपासाची सुत्रे फिरवत राणा सिकलगर नावाच्या समता नगर मधील संशयित तरुणाला अटक करण्यात आली आहे.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, माजी नगरसेवक संतोष पाटील यांच्या घराचे बांधकाम सुरू असून तेथे काम करणारे मजूर कुटुंब कोल्हे हिल्स परिसरातील जाणता राजा स्कूलजवळ झोपडीत राहते. हे सर्व कुटुंबीय रोजची कामे पूर्ण करून पात्री झोपले होते. त्यानंतर पहाटे साडेतीनच्या सुमारास पीडितेच्या वडील आणि काकांना तिच्या रडण्याचा आवाज आला. त्यांनी बाहेर येऊन पाहिले तर चिमुरडी रक्तबंबाळ अवस्थेत पडजली होती. अज्ञात व्यक्तीने तिच्यावर अत्याचार केला होता. त्यांनी आसपास शोध घेतला पण कोणीही मिळाले नाही. पोलिसांनी पुरावे गोळा करण्यासाठी फॉरेन्सिक तज्ञांना बोलावले आहे. तसेच मुलीच्या आई वडिलांचा जबाब देखील नोंदवून घेतला आहे.

आतून बंद होते घर

घटनेसंदर्भात पीडितेच्या वडिलांनी सांगितले की, ते घरामध्ये नेहमीप्रमाणे आतून बंद करून झोपलेले होते. पण घराची कडी कोणी उघडली आणि हा प्रकार कोणी केला याबाबत माहिती नसल्याचे ते म्हणाले. कोणावर संशय नसल्याचेही सांगितले. तसेच घरातील मोबाईल चोरीला गेला असल्याचेही सांगितले.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPOCSO Actपॉक्सो कायदाMaharashtraमहाराष्ट्र