नरेंद्र जावरे चिखलदरा (अमरावती) : चिखलदरा पर्यटनासाठी येणाऱ्या नागपूर, काटोल, यवतमाळ, उमरी येथील पर्यटकांच्या वाहनांना मडकी घाटात अडवून मारहाण व लुटमार करणाऱ्या तीन तोतया पोलिसांना शनिवारी अटक करण्यात आली. यातील एक सैनिक असून दोघे त्याच्या गावातील मित्र असल्याची माहिती पुढे आली आहे. शनिवारी पहाटे ४.३० पासून त्यांनी पोलिसांचा वेश परिधान करून लूटमारीच्या कारवाया केल्या. लुटल्या गेलेल्या पर्यटकांनी माहिती देताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून तिघांना ताब्यात घेतले. चौकशीअंती त्यांना अटक करण्यात आली आहे. पुढील तपास चिखलदरा पोलीस करीत आहे.
चिखलदरा घाटात नागपूर, यवतमाळ, काटोलच्या पर्यटकांची तोतया पोलिसांकडून लुटमार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 7, 2021 16:14 IST