डोंबिवली - मध्य रेल्वेचे ट्रॅकमन (चावीवाला) जोगेश्वर प्रजापती, ५५, कोळसेवाडी, कल्याण पूर्व येथे राहणारे यांचा रेल्वेअपघातातमृत्यू झाला आहे. ही घटना आज दुपारी ३ वाजताच्या दरम्यान घडली. दोन रेल्वे गाड्यांच्या मधोमध अडकून गोंधळ झाल्याने हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.उपनगरिय रेल्वे प्रवासी प्रवासी एकता संस्थेचे पदाधिकारी राजेश घनघाव यांनी दिलेल्या माहितीनूसार खर्डी स्थानकादरम्यान अप मार्गावर ही घटना घडली. प्रजापती हे कार्यरत असतांना दोन्ही दिशांकडून रेल्वे गाड्या आल्या. त्या दरम्यान गोंधळून गेलेल्या प्रजापती यांचा अप दिशेकडील रेल्वेच्या धडकेने मृत्यू झाल्याची माहिती कल्याण लोहमार्ग पोलीस ठाण्याने त्यांना दिली. तसेच काही प्रत्यक्षदर्शींनी हा अपघात झाल्याचे त्यांना सांगितले होते. त्यानूसार त्यांनी माहिती घेतली असता रेल्वे कर्मचा-याचा अपघात झाल्याचे त्यांना समजले.काही वर्षांपूर्वी कल्याण स्थानकात पत्रीपूलादरम्यान चार गँगमनचा अपघाती मृत्यू झाला होता. त्या वेळीही गँगमन, ट्रॅकमनच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला होता. पण तरीही रेल्वे प्रशासनाने काळजी घेतलेली नसल्यानेच त्या विभागातील कर्मचा-यांचे अपघात सत्र सुरुच असल्याचे घनघाव म्हणाले. त्याकडे गांभिर्याने लक्ष द्यावे अशी मागणी त्यांनी केली आहे.
खर्डीत रेल्वे अपघातात ट्रॅकमनचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: July 24, 2019 7:29 PM
ही घटना आज दुपारी ३ वाजताच्या दरम्यान घडली.
ठळक मुद्देदोन रेल्वे गाड्यांच्या मधोमध अडकून गोंधळ झाल्याने हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.काही वर्षांपूर्वी कल्याण स्थानकात पत्रीपूलादरम्यान चार गँगमनचा अपघाती मृत्यू झाला होता.