कानपूर - बॉलिवूड अभिनेता वरुण धवनला उत्तर प्रदेशातील कानपूरमध्ये हेल्मेटशिवाय गाडी चालवणे महागात पडले. विना हेल्मेट बुलेटचे प्रकरण सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. शूटिंगदरम्यान त्याने वापरलेल्या बुलेट वाहनावर बनावट नंबर प्लेट असल्याचे सांगण्यात येत आहे. बुलेटवर उन्नाव येथून नोंदणीकृत स्प्लेंडर बाइकचा क्रमांक आहे. आता त्याच्या फोटोच्या आधारे चलानची कारवाई करण्यात आली आहे. वास्तविक, गेल्या अनेक दिवसांपासून कानपूरमध्ये बवल चित्रपटाचे शूटिंग सुरू आहे. ज्यासाठी वरुण धवन कानपूरमध्ये आहे. अभिनेत्याची एक झलक पाहण्यासाठी त्याचे चाहतेही रस्त्यावर उतरले.कानपूरमध्ये अनेक ठिकाणी शूटिंग सुरू आहे, अशा परिस्थितीत शूटिंगदरम्यान एक काळी बुलेट गाडी चालवली. त्यावेळी त्याने हेल्मेट घातले नव्हते आणि हेल्मेटशिवाय गाडी चालवल्याचा फोटो व्हायरल झाला होता. ज्यावर अनेकांनी कमेंटही केल्या. बनावट नंबरप्लेटच्या मुद्द्यावर अद्याप कोणतीही कारवाई झालेली नाही. वरुणला नोटीस पाठवण्याची तयारीही पोलिसांकडून सुरू आहे.
धक्कादायक! ९ वर्षाच्या मुलाचा साडे चार वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचारबुधवारी त्याने पी रोड मार्केटच्या रस्त्यावर आपली बुलेट चालवली. गुरुवारी त्याने कँट आणि डिप्टी पड़ाव येथे शूटिंग केलं. माहिती देताना कानपूरचे डीसीपी ट्रॅफिक संकल्प शर्मा यांनी सांगितले की, दोन दिवसांपूर्वी कानपूर नगरमध्ये एका चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान एमव्हीए कायद्याअंतर्गत काही नियम आहेत. या नियमांची पायमल्ली करण्यात आली आहे. आम्हाला मिळालेल्या फोटोच्या आधारे आम्ही MVA कायद्यानुसार कारवाई करत आहोत.