मुंबई - कपडे धुण्याच्या द्रव साबणाच्या बाटलीतून अंमली पदार्थ लपवून आणत त्याची तस्करी करणाऱ्या तीन लोकांना मुंबई विमानतळावरील सीमा शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी अटक केली आहे. त्यांच्याकडे २८१ ग्रॅम अंमली पदार्थ आढळून आले असून त्याची आंतरराष्ट्रीय बाजारातील किंमत ६७ लाख ५६ हजार रुपये इतकी आहे. हे तीनही प्रवासी भारतीय नागरिक आहेत.
परदेशातून एका विमानातून अंमली पदार्थ येत असल्याची विशिष्ट माहिती सीमा शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांना मिळाली होती. त्यानुसार अधिकाऱ्यांनी संबंधित विमानाच्या बाहेर सापळा रचला होता. त्या दरम्यान या विमानाने आलेल्या तीन प्रवाशांच्या हालचासी संशयास्पद वाटल्यामुळे अधिकाऱ्यांनी त्यांची चौकशी केली. त्या वेळी त्यांच्या सामानात कपडे धुण्याच्या द्रव साबणाची बाटली आढळून आली. त्यामध्ये हे अंमली पदार्थ त्यांनी लपवले होते. यापैकी दोन आरोपी पुणे तर आरोपी गोव्यातील असल्याची माहिती आहे.