मध्य प्रदेशच्या होशंगाबाद इथं ह्दयद्रावक घटना घडली आहे. याठिकाणी कौटुंबिक वादातून एका युवकाने रेल्वे ट्रॅकवर जात आत्महत्या केली आहे. या घटनेची माहिती मिळताच मृत युवकाचे वडील घटनास्थळी पोहचले. मुलाचा मृतदेह पाहून वडिलांना धक्काच बसला. हतबल वडिलांनी मृत मुलाचा मतदेह कवटाळून आक्रोश केला. तेव्हा रेल्वे ट्रॅकवर दुसरी ट्रेन आली आणि रेल्वेच्या धडकेत वडील जखमी झाले.
ही घटना गुरुवारच्या मध्यरात्रीची आहे. छोटेलाल विश्वकर्मा आणि त्याचे वडील सीताराम विश्वकर्मा या दोघांचा रेल्वेच्या धडकेत मृत्यू झाला आहे. जीआरपी अधिकारी एसएस शुक्ला म्हणाले की, छोटेलालची पत्नी प्रिती सासरपासून दूर खेरुआमध्ये राहते. पती-पत्नी या दोघांमध्ये वाद सुरु होते. त्यामुळे दोघंही वेगळे राहत होते. त्यामुळे छोटेलाल तणावात राहत होता. गुरुवारी रात्री पती-पत्नीमध्ये वाद झाला होता. त्यामुळे छोटेलाल रागाच्या भरात घरापासून दूर असलेल्या रेल्वे ट्रॅकवर जाऊन झोपला. तेव्हा ट्रेनच्या धडकेत त्याचा जीव गेला.
ज्यावेळी ही दुर्घटना छोटेलालच्या कुटुंबाला समजताच घरातील सगळेच जण रेल्वे ट्रॅकच्या दिशेने धावत गेले. तेव्हा मुलाचा मृतदेह पाहून वडील शांतीलाल यांनी घटनास्थळीच त्याला कवटाळून बसले. मुलाच्या मृत्यूनं वडिलांवर दु:खाचा डोंगर कोसळला. वडील आक्रोश करत होते तेव्हा रेल्वे ट्रॅकवरुन दुसरी ट्रेन आली. तेव्हा रेल्वे इंजिनच्या धडकेत वडील शांतीलाल दूर फेकले गेले. त्यामुळे त्यांच्या डोक्याला मार लागला. त्यानंतर स्थानिकांनी शांतीलाल यांना उपचारासाठी दवाखान्यात नेले मात्र उपचारावेळी त्यांचा मृत्यू झाला. सोहागपूरच्या परिसरात पिता-पुत्राच्या मृत्यूनं शोककळा पसरली आहे.
रेल्वे ट्रॅकवर विखुरलेल्या अवस्थेत आढळला मृतदेह
छोटेलाल आणि शांतीलाल यांचं घर रेल्वे ट्रॅकपासून १०० मीटर अंतरावर आहे. सोहागपूर पलकमती नदी दरम्यान खंबा नंबर ७९५/१० ते ७९५/१४ दरम्यान ही दुर्घटना घडली. रेल्वेच्या धडकेने युवकाच्या मृतदेहाचे तुकडे इतर ठिकाणी पडले. जीआरपीने रात्री शरीराच्या विखुरलेल्या भागांना एकत्र केले.