मुंबई - विधानसभा निवडणूकीसाठी आचार संहिता लागू होण्यासाठी ८ ते १० दिवसाचा अवधी असताना अधिकाऱ्यांच्या बदल्याची कार्यवाही गतीने केली जात आहे. राज्यातील १३ पोलीस निरीक्षकांच्या विनंतीनुसार बदल्या करण्यात आल्या आहेत. पोलीस मुख्यालयातून बुधवारी रात्री उशिरा त्याबाबतचे आदेश जारी करण्यात आले आहेत.निवडणूक आयोगाने पोलीस महासंचालकांना निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक तत्वामध्ये येणाऱ्या अधिकाऱ्यांच्या बदल्या २८ ऑगस्टपर्यंत करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार बहुतांश अधिकाऱ्यांच्या घटकनिहाय बदल्या करण्यात आल्या. मात्र,काही इच्छुकांना आपल्याला हव्या असलेल्या घटकामध्ये बदली करण्याबाबत गृह विभाग व पोलीस मुख्यालयातून प्रयत्न चालविले होते. जवळपास ५० वर निरीक्षकांचा त्यामध्ये समावेश होता. त्यापैकी १३ अधिकाऱ्यांच्या त्यांना आवश्यक असलेल्या घटकामध्ये बदल्या करण्यात आल्या असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.
राज्यातील १३ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 5, 2019 19:51 IST
निरीक्षकांच्या विनंतीनुसार बदली
राज्यातील १३ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या
ठळक मुद्दे१३ अधिकाऱ्यांच्या त्यांना आवश्यक असलेल्या घटकामध्ये बदल्या करण्यात आल्या धिकाऱ्यांच्या बदल्या २८ ऑगस्टपर्यंत करण्याचे आदेश दिले होते.