मुंबई - मुंबई पोलीस आयुक्तालयातर्गंत कार्यरत असलेल्या ३४२ पोलीस निरीक्षकांच्या विविध विभागात बदल्या करण्यात आलेल्या आहेत. मुंबईतच पदोन्नती मिळालेल्या बहुतांश अधिकाऱ्यांना ‘साईड ब्रॅँच’ला बदली करण्यात आलेली आहे. सोमवारी रात्री त्याबाबतचे आदेश जारी करण्यात आले. येत्या २,३ दिवसात सहाय्यक निरीक्षक व उपनिरीक्षकांच्या बदल्या केल्या जाणार आहेत.दीड-दोन महिन्यापूर्वी बदली होवून आलेले ,तसेच मुंबईतच पदोन्नती मिळालेले निरीक्षक नियुक्तीच्या प्रतिक्षेत होते. मात्र वरिष्ठ निरीक्षकांच्या बदल्या, पदोन्नती रखडल्याने त्यांच्याही नियुक्ती लांबल्या होत्या. गेल्या आठवड्यात गृह विभागाकडून सहाय्यक आयुक्तांच्या , वरिष्ठ निरीक्षकांच्या बदल्याचे आदेश जारी झाल्याने मुंबईतील संबंधित अधिकाऱ्यांना कार्यमुक्त करण्यात आले. त्यानंतर निरीक्षकांच्या नियुक्तीला सोमवारी ‘मुहूर्त’ मिळाला. त्यामध्ये मुंबईतील व बाहेरुन आलेले तसेच एकाच पोलीस ठाणे, शाखेत दोन वर्षाचा कार्यकाळ पुर्ण झालेले अशा एकुण ३४२ अधिकाऱ्यांचा समावेश आहे. पदोन्नती मिळालेल्या अनेक अधिकाऱ्यांना ‘साईड ब्रॅँच’ दाखविल्याने त्यांच्यात नाराजीचे वातावरण आहे.एटीएसला बदली झालेल्याची ‘कंट्रोल’ला रवानगीराज्य पोलीस मुख्यालयातून दोन महिन्यापूर्वी मुंबई पोलीस दलातून बारा अधिकाऱ्यांची दहशतवाद विरोधी पथकात (एटीएस) बदली झाली आहे. मात्र त्यांनी परस्पर पोलीस महासंचालकांकडे अर्ज करीत बदली करुन घेतल्याने पोलीस आयुक्तांनी त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली, त्याचप्रमाणे त्यांना अद्याप कार्यमुक्त करण्यात आलेले नाही. सोमवारी त्यापैकी बहुतांश निरीक्षकांची मुख्य नियंत्रण व विभागीय नियंत्रण कक्षात बदली करण्यात आली आहे.
मुंबईतील ३४२ पोलीस निरीक्षकांच्या बदल्या
By ऑनलाइन लोकमत | Published: August 06, 2019 8:06 PM
सोमवारी रात्री त्याबाबतचे आदेश जारी करण्यात आले.
ठळक मुद्देयेत्या २,३ दिवसात सहाय्यक निरीक्षक व उपनिरीक्षकांच्या बदल्या केल्या जाणार आहेत.पदोन्नती मिळालेल्या अनेक अधिकाऱ्यांना ‘साईड ब्रॅँच’ दाखविल्याने त्यांच्यात नाराजीचे वातावरण आहे.