Crime News : स्वत:ला ट्रान्सजेंडर महिला सांगून एका व्यक्तीने 14 वर्षीय मुलगी आणि तिच्या परिवाराचा विश्वास जिंकला. त्यानंतर त्या मुलीवर रेप केला. कागदपत्रांमध्ये या पुरूषाचा जेंडर पुरूष आहे. पण तो स्वत:ला महिलेच्या रूपात प्रेसेंट करत होता. रेपच्या या घटनेचा खुलासा तेव्हा झाला जेव्हा 14 वर्षीय मुलगी प्रेग्नेंट झाली. दोषी ठरवण्यात आलेल्या या व्यक्तीला रेपच्या केसमध्ये साडे नऊ वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. कोर्टाने या व्यक्तीला पुरूष म्हणूनच दोषी ठरवलं. त्याला पुरूषांच्या तुरूंगात पाठवण्यात आलं आहे.
25 वर्षीय डेविड ऑर्टन याने पीडित परिवारासोबत ट्रान्सजेंडर महिला असल्याचं सांगत ओळख वाढवली. पण तो कायदेशीररित्या पुरूष होता. नंतर पीडित मुलीच्या कुटुंबियांनी पोलिसांना याची माहिती दिली. ब्रिटेनच्या लेस्टरशायरमध्ये राहणाऱ्या ऑर्टनने पीडित मुलीसोबत मैत्री केली आणि नंतर तिच्यासोबत संबंध ठेवले.
पीडित मुलीला सुरूवातीला याची जाणीव झाली नाही की, ती लैंगिक शोषणाची शिकार झाली आहे. गेल्यावर्षी जून महिन्यात आरोपीसोबत रिलेशनशिपबाबत पोलिसांना सांगितलं. ती म्हणाली की, ती ऑर्टनच्या मुलाची आई होणार आहे.
हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर महिलांच्या अधिकारांवर काम करणाऱ्या संघटनेने या घटनेवर आपलं मत व्यक्त केलं. 29 नोव्हेंबरला महिला संघटनेची कॅम्पेनर कॅरोलिन फिस्केने डेलीमेलला सांगितलं की, ही घटना एक ट्रेजडी आहे.
तेच मुलीच्या कुटुंबियांशी संबंधीत सूत्रांनी डेलीमेलला सांगितलं की, ऑर्टनने पीडित परिवारासमोर स्वत:ला ट्रान्सजेंडर महिलेच्या रूपातच सादर केलं होतं. त्याने महिला बनून पीडित मुलीसोबत जवळीक वाढली होती. पोलिसांनी हे सांगितलं की, चौकशी दरम्यान ऑर्टन सतत हाच दावा करत होता की, त्याने काहीच चुकीचं केलं नाहीये.