मुंबई - रायगड जिल्यातील अलिबाग येथील फरार हिरे व्यापारी नीरव मोदीच्या बंगल्याविरोधात कारवाई करत आयकर विभाग आणि अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) बांगला जमीनदोस्त केला.मात्र, या बंगल्यात निजाम काळातील पडदे, महागडी पेंटिंग्स आई आणि ३० लाखांची लिलावात घेतलेली लाकडी कार सापडली आहे.
कारवाईदरम्यान ईडी आणि आयकर विभागाने छापा टाकून काही प्रसिद्ध चित्रकारांच्या १२५ हुन अधिक पेंटिंग्स जप्त केली आहेत. तसेच हैद्राबादच्या निजामाशी संबंधित अंदाजे १०० वर्षापूर्वीचे जुने पडदे आणि हॉंगकॉंगमध्ये लिलावात २० लाखांना विकत घेतलेली लाकडी कारचे मॉडेल सुद्धा आढळून आले आहे. २५ जानेवारीला अलिबाग येथील किहिम बीचनजीक असलेल्या नीरव मोदीचा १०० कोटींचा बंगाला जमीनदोस्त करण्यात आला आहे. उपविभागीय अधिकारी शारदा पोवार यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई सुरु आहे. त्यावेळी अधिकाऱ्यांना नीरव मोदींच्या बंगल्यात दुर्मिळ वस्तूंचा खजिना सापडला आहे. एम. एफ. हुसैन, के. के. हेब्बर, एंजोली इला मेनन, विवान सुंदरम, राजा रवि वर्मा या प्रसिद्ध चित्रकारांसह अन्य महागडी आणि दुर्मिळ पेंटिंग्ज कारवाईदरम्यान जप्त करण्यात आली आहेत.