धक्कादायक! महिलेच्या गुप्तांगात मिरची पावडर टाकून केला व्हिडीओ शूट
By ऑनलाइन लोकमत | Published: February 01, 2020 1:50 PM
२२ वर्षीय महिलेच्या गुप्तांगात मिरची पावडर टाकून तिला मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
ठळक मुद्दे२२ वर्षीय महिलेने वाडज पोलीस ठाण्यात तीन महिलांविरोधात मारहाण केल्याची तक्रार दाखल केली आहे. त्या वेदनेत देखील त्यांनी मोबाइल फोनमध्ये माझा व्हिडिओ शूट केला,असं पीडिते महिलेने तक्रारीत म्हटलं आहे.
अहमदाबाद - २२ वर्षीय महिलेने वाडज पोलीस ठाण्यात तीन महिलांविरोधात मारहाण केल्याची तक्रार दाखल केली आहे. वाडज परिसरात पीडित महिलेच्या पूर्व प्रियकराच्या पत्नीसह तीन महिलांनी २२ वर्षीय महिलेच्या गुप्तांगात मिरची पावडर टाकून तिला मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
पीडित महिलेने तक्रारीत दिलेल्या माहितीनुसार, चार वर्षांपूर्वी ती गिरीश गोस्वामी (आरोपी महिला जानूचा पती) यांच्या नरनपुरा येथील गारमेंट दुकानात नोकरी करत होती. त्यादरम्यान गिरीश आणि पीडित महिला प्रेमात पडले. या दोघांचे प्रेमसंबंध जवळपास दोन वर्षे होते. त्यानंतर दोघांचे प्रेमसंबंध तुटले होते आणि पीडित महिला वस्त्रपूर येथील एका गारमेंटच्या दुकानात नोकरी करू लागली. दोन महिन्यांपूर्वी गिरीशने पुन्हा तिला फोन करून संपर्क केला आणि दोघे एकमेकांशी पुन्हा फोनवरून बोलू लागले. याबाबत गिरीशची पत्नी जानू गोस्वामी हिला हे दोघे एकमेकांच्या पुन्हा संपर्कात आल्याचं कळलं. जानूने पीडित तक्रारदार महिलेला फोन करून धमकावलं. इतक्यावरच न थांबता जानूने धक्कादायक कट रचला.पीडिता महिला गुरुवारी सकाळी ९.४५ वाजताच्या सुमारास प्रगतीनगर येथे जाण्यासाठी वाडज येथील घरातून बाहेर पडली. दरम्यान तिला रस्त्यात जानू आणि तिची मैत्रीण रिंका गोस्वामी या दोघींनी स्कूटरवरून गाठले आणि त्यांनी पीडितेला जबरदस्ती स्कूटरवर बसवले. स्कुटर जानूच्या घरच्या दिशेने नेली.तिथे ठाकुरी गोस्वामी ही आणखी एक मैत्रीण जानूच्या घरी उपस्थित होती. जानू, रिंका आणि ठाकुरी या तिघींनीही तिला एका खोलीत डांबून ठेवले. त्यानंतर माझे कपडे उतरवून गुप्तांगात मिरची पावडर टाकली असे पीडित तक्रारदार महिलेने तक्रारीत नमूद केले आहे. त्यानंतर मला खूप वेदना झाल्या.
त्या वेदनेत देखील त्यांनी मोबाइल फोनमध्ये माझा व्हिडिओ शूट केला,असं पीडिते महिलेने तक्रारीत म्हटलं आहे. त्यावेळी गिरीशच्या पत्नीने धमकी देत माझ्याकडे ५० लाख रुपयांची मागणी केली. गिरीशनं तिच्या कपड्यांवर लाखो रुपये खर्च केले असा गिरीशची पत्नी जानूने आरोप केला. तसेच गिरीशला पुन्हा भेटशील तर चेहऱ्यावर अॅसिड फेकेन अशी धमकीही दिली. त्यानंतर पीडित महिलेला सोडून दिले. या प्रकरणी तिघींनाही अटक करण्यात आली असल्याची माहिती पोलीस निरीक्षक जे. ए. राठवा यांनी दिली.