चिखलदरा (अमरावती) - मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या अकोट वन्यजीव विभागातील नरनाळा परिक्षेत्रांतर्गत दोन किलो वजनाच्या मांडूळ सापासह तिघांना अटक करण्यात आली. मंगळवारी रात्री ९ वाजता व्याघ्र प्रकल्पाच्या अधिकाऱ्यांची सापळा रचून सदर कारवाई केली. आरोपींना अकोट येथील प्रथमश्रेणी न्यायालयाने २६ जूनपर्यंत वनकोठडी सुनावली आहे.
अकोला जिल्ह्यातील लीलाधर श्रीपती इंगळे (२८, रा. सौंदळा, ता. तेल्हारा), अक्षय रमेश पंचांग (२५, रा. खंडाळा, ता. तेल्हारा) व बुलडाणा जिल्ह्यातील भानुदास रामदास कोकाटे (५०, रा. पिंगळी आडगाव, ता. संग्रामपूर) यांना अटक करून त्यांच्याविरुद्ध वन्यजीव अधिनियम १९७२ च्या कायद्यान्वये कारवाई करण्यात आली.
आरोपींना बुधवारी अकोट येथील प्रथमश्रेणी न्यायदंडाधिकारी यांच्या न्यायालयात हजर केले असता, २६ जूनपर्यंत वनकोठडीचे आदेश न्यायालयाने दिले. अकोट वन्यजीव विभागाचे सहायक वनसंरक्षक एल.ए. आवारे वानपरिक्षेत्राचे वनपरिक्षेत्र अधिकारी पी.डी. पाटील, वनरक्षक के.ए. चौधरी, बी.बी. खोडवे, सुनील तायडे, एस.बी. सरकटे, ए.झेड. हुसेन आदींच्या पथकाने आरोपींना मेळघाट व्याघ्र प्रकल्पांतर्गत नरनाळा परिक्षेत्रातील दक्षिण शहापूर बीटमध्ये सौंदळा फाटा परिसरात अटक केली. मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचे मुख्य संरक्षक तथा क्षेत्र संचालक एम.एस. रेड्डी, अकोट वन्यजीव विभागाच्या उपवनसंरक्षक टी. ब्यूला एलील मती यांच्या मार्गदर्शनातून नरनाळा परिक्षेत्राचे वनपरिक्षेत्राधिकारी व्ही.एस. चव्हाण पुढील तपास करीत आहेत. मांडूळ साप आरोपी कुणाला विकत होते, कोण त्यांच्या संपर्कात होते आदी सर्व बाबींचा खुलासा होणे बाकी आहे.
अन्य महत्वाच्या बातम्या...
नग्नावस्थेत फ्रिजमध्ये आढळले महिलेचे अर्धवट शरीर, बलात्कार करून निर्घृण हत्या केल्याची शक्यता
Shocking! भारत-चीन सीमेवर IES अधिकारी बेपत्ता, घरात सुरू होती लगीनघाई
लज्जास्पद! अपहरण करून मुलीवर बलात्कार; चौघांना अटक, मुख्य आरोपी भाजपा पंच फरार
विवस्त्र करून तरुणाला बेदम मारहाण, व्हिडिओ व्हायरल होताच पोलिसांनी घेतले दोघांना ताब्यात
थरारक! दुचाकी पार्किंगच्या वादातून महिलेची केली चाकू भोसकून हत्या