आग्रा - सहा लग्न केलेले उत्तर प्रदेशचे माजी मंत्री चौधरी बशीर (Chaudhary Bashir) यांच्याविरोधात तिहेरी तलाकचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आग्रा येथील मंटोला पोलीस ठाण्यात त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. नगमा या त्यांच्या चौथ्या पत्नीने हा गुन्हा दाखल केला आहे. माजी मंत्री बशीर हे कपड्यांप्रमाणे बायका बदलतात, असा आरोप करण्यात आला आहे. याशिवाय बशीर यांच्यावर आणखीही काही गंभीर आरोप आहेत. हा गुन्हा एसएसपी यांच्या आदेशानंतर दाखल करण्यात आला आहे.
महिलांसोबत मौज केल्याचा आरोप -चौधरी बशीर यांची पत्नी नगमा यांनी आरोप केला आहे, की बशीर यांना महिलांसोबत मौज करायला आवडते. 2012मध्ये त्यांचे चौधरी बशीरसोबत लग्न झाले. लग्नानंतर त्यांनी त्यांचा शारीरिक आणि मानसिक छळ केला. अनेक वेळा जबरदस्तीने शारीरिक संबंध बनवले. याप्रकरणी चौधरी बशीर विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. यावेळी ते 23 दिवस तुरुंगातही राहिले होते. नगमा यांनी त्यांचा एक व्हिडिओ सोशल मिडियावरही अपलोड केला आहे. व्हिडिओमध्ये त्यांनी बशीर यांच्यावर आणखी गंभीर आरोप केले आहेत.
मुलानं वृद्ध आई-वडिलांना मारहाण करत घराबाहेर काढलं, काही मिनीटातच पोलिस आयुक्तांनी घडवली अद्दल
8 दिवसांपूर्वीच केले सहावे लग्न -नगमा यांनी म्हटले आहे, की त्या गेल्या तीन वर्षांपासून माहेरी राहतात. त्याचा चौधरी बशीरसोबत न्यायालयात वाद सुरू आहे. त्यांना 23 जुलैला समजले, की चौधरी बशीर पुन्हा लग्न करणार आहे. त्या त्यांच्याकडे गेल्या, पण तेथून त्यांना तीन वेळा तलाक सांगून हकलून लावण्यात आले. नगमा यांनी म्हटले आहे, की बशीर यांनी सहावे लग्न शाहिस्ता नावाच्या महिलेशी केले आहे. शाहिस्ता आधीच विवाहित आहे आणि अद्याप तिचा तिच्या पहिल्या पतीपासून घटस्फोटही झालेला नाही.आमदार गजाला यांच्यासोबत पहिलं लग्न -चौधरी बशीर यांचा 2003मध्ये कानपूरच्या आमदार गजाला यांच्यासोबत प्रेम विवाह झाला होता. बसपाच्या सर्वेसर्वा मायावती यांनी या दोघांचे लग्न लावून दिले होते. यानंतर दोघांनी बसपामधून समाजवादी पक्षात प्रवेश केला. दोघांनाही एक मुलगा आहे. नंतर दोघांचा घटस्फोट झाला. नगमाने सांगितले की बशीर यांनी दुसरे लग्न हिंदू रितीनुसार गिन्नी कक्कडसोबत केले. तिसरे लग्न दिल्लीच्या तरन्नुमशी झाले आणि चौथे लग्न त्यांच्यासोबत केले.
अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार, चार जणांना अटक
या माजी मंत्र्याने 2018मध्ये रुबिना नावाच्या महिलेशी पाचवे लग्न केले. पोलीस ठाण्याचे प्रभारी विनोद कुमार यांनी सांगितले की, माजी मंत्र्या विरुद्ध मुस्लीम महिला संरक्षण कायदा, तिहेरी तलाकअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याशिवाय, चौधरी बशीर विरोधात अनेक गुन्हेही दाखल आहेत, जे सध्या न्यायालयात प्रलंबित आहेत.