राजस्थानच्या उदयपूर पोलिसांनी एक धक्कादायक गुन्ह्याचा खुलासा केला आहे. ज्यात एका महिलेने दिरासोबत असलेल्या अनैतिक संबंधातून नवऱ्याची हत्या केली आहे. विशेष पोलीस पथकाने ५ महिन्याच्या अथक तपासानंतर हा आश्चर्यजनक खुलासा केला आहे. ही घटना उदयपूर शहराच्या प्रतापनगर परिसरात घडली आहे. ५ महिन्यापूर्वी अज्ञात मृतदेह पोलिसांना सापडला होता.
आता या प्रकरणात पोलिसांनी आरोपी भाऊ, मृतकाची बायको आणि या गुन्ह्यात सहभागी असणारे अन्य ५ साथीदारांना अटक केली आहे. एसपी डॉ. राजीव पचार यांनी पत्रकार परिषद घेत या गुन्ह्याचा उलगडा केला आहे. पोलिसाच्या विशेष पथकातील कॉन्स्टेबल प्रल्हाद पाटीदार यांना मिळालेल्या माहितीनुसार, काही लोक एका व्यक्तीच्या बनावट मृत्यू प्रमाणपत्र बनवत असल्याचं कळालं. यातील २ लोकांवर पोलिसांनी पाळत ठेवली. हे लोक मृत व्यक्तीचं प्रमाणपत्र बनवणार होते. पोलिसांनी या दोघांना ताब्यात घेतलं आणि चौकशी केल्यानंतर या दोघांनी इतर ३ साथीदारांसह हत्या केल्याचा गुन्हा कबूल केला.
आरोपींना या हत्येसाठी त्रिपुरा येथील प्रदीपदास नावाच्या व्यक्तीला सुपारी दिली होती. स्पेशल टीम आणि प्रतापनगर पोलिसांनी या गुन्ह्याचा छडा लावला. या प्रकरणात मयत व्यक्तीचा मोठा भाऊ तपनदास आणि मयताची पत्नी यांच्यात अनैतिक संबंध असल्याचं समोर आलं. या हत्याकांडाचे मास्टर माईंड मयताचा भाऊ आणि पत्नीला अटक केली. सुपारी देऊन भावाची हत्या केल्याचं पोलिस तपासात कबूल केले.
हत्येनंतर भावाने गावी जाऊन मृत्यूचं कारण कोरोना असल्याचं सांगितले. त्यानंतर सर्व प्रथापरंपरेनुसार अंत्यसंस्कार करण्यात आले. पोलिसांनी मयताचा भाऊ, मयताची पत्नी यांच्यासह ५ स्थानिक गुन्हेगारांना अटक केली आहे. ज्यांनी चित्रपटाच्या कथेप्रमाणे ही हत्या घडवून आणली. माहितीनुसार मयक उत्तमदास यांची एक कंपनी होती. ज्याची वर्षाला आर्थिक उलाढाल ५ कोटींची होती. उत्तमदासने कंपनीमार्फत राजस्थान तहसील कार्यालयाच्या नुतनीकरणासाठी कंत्राट घेतलं होतं. ज्याचं काम राकेश नावाच्या आरोपींपैकी एक असलेला पाहत होता.
मृतकाचा भाऊ तपनदास आणि मृतकाची पत्नी रुपाने उत्तमदासला उदयपूरला पाठवलं होतं. त्यानंतर राकेश आणि त्याच्या ४ साथीदारांना १२ लाख रुपयांची सुपारी दिली होती. उत्तमदास उदयपूरला आल्यानंतर राकेश आणि त्याच्या साथीदारांनी दारू पाजून उत्तमची गळा दाबून हत्या केली आणि त्याचा मृतदेह उदयसागर धबधब्याकिनारी फेकला. पोलिसांनी अगोदर आरोपींना पकडलं त्यानंतर मृतकाची ओळख पटली. उत्तमदासच्या घराचा तपास केला असताना अनेक महत्त्वाचे पुरावे हाती लागले. मागील वर्षी नोव्हेंबरमध्ये हत्या केल्यानंतर त्याच्या राहत्या गावी अंत्यसंस्कार पार पडले. अनेक दिवसांपासून उत्तमचं मृत्यू प्रमाणपत्र न मिळाल्याने रुपा त्याची संपत्ती आणि अनेक योजनांपासून वंचित होती. याच कारणामुळे तिने बनावट मृत्यू प्रमाणपत्र बनवण्यासाठी प्रयत्न केला. तेव्हा पोलिसांनी हाती आरोपी सापडले आणि संपूर्ण प्रकरणाचा उलगडा झाला.