मुंबई - अनेक वेगवेगळ्या गुन्ह्यांपासून सुरक्षित राहण्यासाठी तसेच वाहतूक सुरक्षेबाबत जनजागृती करण्यासाठी मुंबई पोलीस नेहमी आपल्या ट्विटर हॅण्डलवरून संदेश देतात. आज रस्ते सुरक्षा आणि वाहतूक नियमांबाबत ट्विटर अकाऊंटवर व्हिडिओव्दारे आवाहन किंवा कार्टून्सच्या माध्यमातून ट्विट केलं जात. मात्र, आज ''मिशन इम्पॉसिबल'' या लोकप्रिय चित्रपट मालिकेचा सहावा भाग “मिशन इम्पॉसिबल- फॉलआऊट” या चित्रपटातील व्हिडिओ वापरुन रस्ते सुरक्षाबाबत संदेश दिला आहे. या ट्वीटला लोकांच्या भरभरुन प्रतिसाद दिला आहे. काही लोकांनी याचे कौतूक केले आहे. तर काही लोकांनी यावरुन वाहतूक पोलिसांना ट्रोल केले.
या व्हिडिओत चित्रपटाचा हिरो टॉम क्रूझ विनाहेलमेट बाईक चालवतो असतो. दुसऱ्याक्षणी त्याची गाडीचा अपघात होऊन तो रस्त्यावर पडतो. “अशाच प्रकारे जर तुम्ही बाईक चालवत रहिलात तर तुम्हच्याकडून दंड वसूल केला जाईल, आमच्यासाठी असे स्टंट थांबविणे इम्पॉसिबल नाही.” असा संदेश त्यांनी व्हिडिओद्वारे दिला आहे.