उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊमधील आशियाना पोलीस स्टेशन परिसरात एका व्यक्तीने पत्नीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पतीने आरोप केला आहे की त्याची पत्नी त्याच्याकडून महागड्या भेटवस्तू मागते. मागणी पूर्ण न केल्यास ती त्याचा मानसिक छळ करते. मिळालेल्या माहितीनुसार, आशियाना येथील रहिवासी जितेंद्र सिंह यांनी सांगितले की, तो नेहमी पत्नी सोनमची मागणी पूर्ण करण्याचा प्रयत्न करत असतो.
सोनमची मागणी आता दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे तो नाराज आहे. पतीने सांगितलं की, त्याची आणि सोनमची फेसबुकवर भेट झाली होती. त्यानंतर 2021 मध्ये दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर दोघेही आशियाना येथील रजनीकंद भागात जितेंद्रच्या घरी राहू लागले. पण काही वेळातच सोनमने त्याला सांगितले की ती तिच्या सासरच्या लोकांसोबत राहू शकत नाही.
पत्नीचा हट्ट पाहून त्याने दुसऱ्या ठिकाणी घर घेतले आणि दोघेही तिथे राहू लागले. मात्र तेव्हापासून सोनमने त्याच्याकडे महागड्या गिफ्ट्सची मागणी सुरू केली आहे. सुरुवातीलात्याने पत्नीची मागणी पूर्ण केली. मात्र तिची मागणी दिवसेंदिवस वाढू लागली. जितेंद्र म्हणाला, "माझी पत्नी सोनम कधी आलिशान कार घेण्यास सांगते तर कधी पैसे मागत राहते. माझ्या आईचे घर तिच्या नावावर करायला सांगितल्यावर तर हद्दच झाली."
"मी तिची मागणी पूर्ण न केल्याने तिने माझा मानसिक छळ सुरू केला. त्याने मला घटस्फोट देण्याची धमकी दिली आहे. यामुळे मला नैराश्य आले आहे." पतीने आशियाना पोलीस ठाण्यात पत्नीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. दुसरीकडे, आशियाना पोलीस स्टेशनचे प्रभारी अजय प्रकाश मिश्रा यांनी सांगितले की, पतीच्या पत्नीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास सुरू आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"