मुंबई - चुकीच्या पद्धतीने टीआरपी मिळवण्यासाठी सक्रिय असलेल्या दोन मराठी चॅनेलच्या मालकांना अटक करून खोट्या टीआरपीचे रॅकेट उघड करण्यात मुंबईपोलिसांना यश आलं आहे. त्यासाठी बदनामी करून पैसे देऊन टीआरपीशी छेडछाड करण्यात आली असल्याची माहिती मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी काल दिली. फक्त मराठी आणि बॉक्स सिनेमा या दोन मराठी चॅनेलच्या मालकांना अटक करण्यात आली आहे. आज दुसर्याच दिवशी शुक्रवारी मुंबई पोलिसांनी रिपब्लिक टीव्ही वरिष्ठ अधिकाऱ्याला चौकशीसाठी समन्स पाठवले आहे. मुंबई पोलिसांनी रिपब्लिक टीव्ही सीएफओ (चीफ फायनान्स ऑफिसर) शिवा सुब्रमणियम सुंदरम यांना समन्स बजावले आणि मुंबई गुन्हे शाखेने त्यांना 10 ऑक्टोबरला (शनिवार) चौकशीत हजर राहण्यास सांगितले आहे.या प्रकरणात रिपब्लिक टीव्हीच्या बँक खात्यांचे फॉरेन्सिक ऑडिटही केले जाईल. माहितीनुसार, पुरावांमध्ये छेडछाड केल्याचा गुन्हा रिपब्लिक टीव्हीवरही नोंदविला जाऊ शकतो. रिपब्लिक टीव्हीच्या प्रवर्तक आणि इतर कर्मचाऱ्यांना देखील समन्स बजावले जाणील. त्यांना तपास पथकासमोर हजर राहण्यास सांगितले जाऊ शकते.
TRP Scam : रिपब्लिक टीव्हीच्या वरिष्ठ अधिकाऱ्याला मुंबई पोलिसांनी बजावले समन्स
By पूनम अपराज | Updated: October 9, 2020 20:17 IST
TRP Scam : या प्रकरणात रिपब्लिक टीव्हीच्या बँक खात्यांचे फॉरेन्सिक ऑडिटही केले जाईल. माहितीनुसार, पुरावांमध्ये छेडछाड केल्याचा गुन्हा रिपब्लिक टीव्हीवरही नोंदविला जाऊ शकतो.
TRP Scam : रिपब्लिक टीव्हीच्या वरिष्ठ अधिकाऱ्याला मुंबई पोलिसांनी बजावले समन्स
ठळक मुद्देमुंबई पोलिसांनी रिपब्लिक टीव्ही सीएफओ (चीफ फायनान्स ऑफिसर) शिवा सुब्रमणियम सुंदरम यांना समन्स बजावले आणि मुंबई गुन्हे शाखेने त्यांना 10 ऑक्टोबरला (शनिवार) चौकशीत हजर राहण्यास सांगितले आहे.